Railway loco pilot Bharti 2024 : रेल्वेमध्ये थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 5696 जागांची मेगा भरती निघाली आहे. रेल्वेमध्ये नोकरीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी संधी मिळणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने नुकतीच असिस्टंट लोको पायलट Assistant Loco Pilot(ALP) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या (RRB) माध्यमातून ही भरती प्रक्रीया राबवण्यात येत आहे.
Railway Loco Pilot Bharti 2024
भारतीय रेल्वेनं असिस्टंट लोको पायलट Assistant Loco Pilot(ALP) पदाची भरतीची ऑनलाईन प्रकीया सुरु केली आहे. रेल्वे बोर्डाच्या विविध 21 भरती बोर्डांमार्फत ही भरती होत आहे. रेल्वे भरती बोर्ड, मुंबईच्या अंतर्गत 547 जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही एकाच भरती बोर्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Railway Loco Pilot Bharti 2024 : रिक्त पदांची तपशील
रेल्वे मध्यवर्ती भरतीच्या centralized recruitment notice (CEN 01/2024) अधिसुचेनेनुसार संपूर्ण भारतामध्ये ही भरती प्रक्रीया चालणार आहे. असिस्टंट लोको पायलट Assistant Loco Pilot(ALP) पदाच्या 5696 जागांची भरती होणार आहे. सातव्या वेतन आय़ोगाच्या पे मेट्रीक्स लेव्हल 2 साठी ही भरती असणार आहे.
Railway Bharti 2024 : अर्ज करण्याची तारीख
रेल्वे भर्ती बोर्डाने जारी केलेल्या असिस्टंट लोको पायलट Assistant Loco Pilot(ALP) पदाच्या ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 20 जानेवारीपासून झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
Railway ALP Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक म्हणजेच 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला असावा. या पदासाठी अभियांत्रिकी डिप्लोमा आणि डिग्री उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील लिंक काळजीपूर्वक वाचावी.
https://rrbmumbai.gov.in/newpdf/ALP-JAN-2024/Detailed%20CEN%2001-2024%20English.pdf
Railway Bharti 2024: वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे तर किमान ३० वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशिलांसाठी अधिसूचना पहा
Railway Loco Pilot Bharti 2024 निवड प्रक्रिया:
रेल्वे भरती पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यातील प्रत्येक टप्प्यांवर विद्यार्थी शॉर्टलिस्ट होईऊ पुढच्या टप्प्यासाठी जाणार आहेत.
टप्पा-1 संगणक आधारित चाचणी (CBT-1 Computer based Test-1),
संगणक आधारित चाचणीमध्ये 75 प्रश्न 60 मिनीटांमध्ये सोडवायचे आहेत. CBT-1साठी गणित,
मानसिक क्षमता, सामान्य विज्ञान आणि सामान्य क्षमता विषयावर प्रश्न विचारले जातील.
टप्पा-2 संगणक आधारित चाचणी-2 (CBT- 2 Computer based Test-2),
संगणक आधारित चाचणी-2 (CBT- 2 Computer based Test-2) दोन भागांमध्ये होईल. यामध्ये एकूण 175 प्रश्न 150 मिनीटांमध्ये (2 तास 30 मिनीट) सोडवायचे आहेत. यासाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात सविस्तर वाचा.
टप्पा-3 संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (Computer based Aptitude test म),
टप्पा-4 दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
टप्पा-5 वैद्यकीय परीक्षा (ME).
उमेदवारांची गुववत्ता यादी CBT- 2 मधील गुण आणि संगणक आधारित अभियोग्यता चाचणी CBAT यांच्या आधारे केली जाणार आहे.
Railway ALP Bhrati 2024 वेतन-
निवड झालेल्या उमेदवारांना सुरवातीला रुपये 19900/- इतके वेतन दिले जाणार आहे.
Railway Bharti 2024: अर्ज शुल्क
रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज फी 500 रुपये आहे. SC/ST, EWS, माजी सैनिक तृतीयपंथी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी शुल्क 250 रुपये आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर लगेच ही फी भरायची आहे.
Railway Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
जाहिरात- https://rrbmumbai.gov.in/newpdf/ALP-JAN-2024/Detailed%20CEN%2001-2024%20English.pdf
ऑनलाइन अर्ज – https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing
CBAT टेस्ट माहिती- https://rdso.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,2