शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अर्थात सिडकोमध्ये 101 जागांची भरती निघाली आहे. सहायक अभियंता (स्थापत्य) Recruitment of Assistant Engineer (Civil) पदासाठी सरळसेवा भरती होत आहे. 19 जानेवारी 2024 रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर माहिती पाहूयात.
CIDCO recruitment 2024
सिडकोमध्ये ‘सहायक अभियंता (स्थापत्य)’ पदासाठी भरती होत आहे. सहायक अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. तर खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठीही आरक्षण असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सिडकोच्या वेबसाइटला आज भेट द्या.
CIDCO recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
‘सहायक अभियंता (स्थापत्य)’ या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी घेतलेली असावी त्याचबरोबर त्याच्याकडे सॅप ईआरपी प्रमाणपत्र असावे. या पदासाठी उमेदवारासाठी अनुभवाची कोणतीही अट नाही याची नोंद इच्छुकांनी घ्यावी.
CIDCO recruitment 2024 वयोमर्यादा
उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 18 जानेवारी 2024 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे तर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे.
CIDCO recruitment 2024 परीक्षेचे स्वरुप
उमेदवारांच्या निवडीसाठी 200 गुणांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षा इंग्रजी, सामान्य ज्ञान, आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांवर आधारित असेल. परीक्षेमध्ये 200 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा पुढच्या प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे.
Recruitment of Assistant Engineer (Civil) परीक्षा शुल्क
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 900+ जीएसटी तर खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 + जीएसटी असे शुल्क असेल. शुल्क ऑनलाईनपद्धतीने भरायचे आहे.
Recruitment of Assistant Engineer (Civil) निवडप्रक्रिया
गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन परीक्षेचे किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी 200 गुणांची ऑनलाइन परीक्षा तसेच सॅप प्रमाणपत्राचे 10 गुण असे एकूण 210 गुणांचा विचार केला जाणार आहे.
CIDCO recruitment 2024 अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या संकेतस्थळाला भेट देऊन भरायचा आहे. या भऱतीच्या संदर्भातील माहिती सिडकोच्या https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
CIDCO recruitment 2024 वेतन
सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. एस-15 वेतन श्रेणीनुसार 41800- 132300 इतका पगार असेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2024 ही आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहाता उमेदवारांनी आजच अर्ज करावा.
Recruitment of Assistant Engineer (Civil) महत्वाच्या लिंक्स
जाहिरात- https://cidco.maharashtra.gov.in/pdf/Career/170563544015258_AECivilAdvertismentcompressed.pdf
सिडकोची वेबसाईट- https://cidco.maharashtra.gov.in/pdf/Career/170563544015258_AECivilAdvertismentcompressed.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आयबीपीएसची बेवसाईट- https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/