तुम्ही ड्रायव्हर असाल आणि तुमची मुंबईत काम करण्याची तयारी असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अंतर्गत येणार्या मुंबई कस्टम्स झोन-1Mumbai Customs मध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती करण्यात येत आहे. स्टॉफ कार ड्रायव्हर पदाची 28 (Gen-13, OBC-07, SC-04, ST-02, EWS-2) जागांची भरती केली जाणार आहे.
Mumbai Customs Bharti 2024: आवश्यक पात्रता
उमेदवार 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावे, त्याचबरोबर मोटर यंत्रणेचे ज्ञान उमेदवारास असावे. उमेदवारास 3 वर्ष मोटार कार चालवण्याचा अनुभव हवा.
आवश्यक कागदपत्र–
i) वयाचा पुरावा,
ii) शैक्षणिक पात्रता,
iii) ड्रायव्हिंग अनुभव प्रमाणपत्र,
iv) ड्रायव्हिंग लायसन्स उतारा/छायाचित्र,
v) SC/ST/OBC/EWS प्रमाणपत्र
Mumbai Customs Bharti 2024: वयोमर्यादा
ड्रायव्हर पदासाठी थेट भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 ते तर कमाल 27 वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
रेल्वेमध्ये लोको पायलट भरती, 5696 जागांसाठी होणार रिक्रुटमेंट… RAILWAY LOCO PILOT BHARTI 2024
Mumbai Customs Bharti 2024: निवड प्रक्रीया
परीक्षा/परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण याची सर्व माहिती उमेदवाराला थेट कळवली जाईल.
उमेदवारांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये होईल. त्यानंतर ड्रायव्हिंग चाचणी आणि मोटर यंत्रणेबद्दल त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. निवड झालेले उमेदवारांसाठी 02 वर्षे प्रोबेशनचा कालावधी असेल.
Mumbai Customs Bharti 2024: वेतन आणि भत्ता स्केल:
स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी स्तर-2 नुसार रु. 19,000-63,200 इतके वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या कामाचे ठिकाण मुंबई असणार आहे.
सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण CIDCO RECRUITMENT 2024
Mumbai Customs Bharti 2024: अर्ज कसा करायचा
उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यामध्ये पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्जावर चिकटवलेला आणि सोबत असे दोन फोटो द्यावेत. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांसहीत खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.
To,
The Deputy Commissioner of Customs,
(Personnel & Establishment)
Office of the Pr. Chief Commissioner of Customs,
New Custom House, Ballard Estate,
Mumbai-400001.
Mumbai Customs Bharti 2024: अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज दिनांक 20.02.2024 रोजी किंवा त्या अगोदर पोहचला पाहिजे. अर्ज पोस्टाने किंवा स्पीडपोस्टनेच पाठवायचा आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी विलंब टाळावा. अर्ज दिलेल्या वेळेतच स्वीकारले जातील .
सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा विहित नमुना पाहण्यासाठी खालील लिंक पाहा.
https://www.mumbaicustomszone1.gov.in/home/NewsandpressRelease