पुण्यामधील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) यथे 198 पदांची भरती होत आहे. त्याची जहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट-सी पदे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू झाली आहे.
NDA Bharti 2024
भारतीय सैन्यातील अधिकारी घडवणारी देशातील महत्वाची संस्था म्हणून राष्ट्रीय सैनिक प्रबोधनीचे( National Defense academy- NDA) नाव घेतले जाते. एनडीएमध्ये १९८ विविध पदाची भरती होणार आहे, यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पाहूयात.
NDA Bharti 2024 : पद आणि रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
- लोअर डिव्हिजन क्लर्क : 16 पदे-12 वी पास + हिंदी टायपिंग अनिवार्य
- स्टेनोग्राफर ग्रेड II: 1 पद- 12वी पास + शॉर्टहॅन्ड टायपिंग अनिवार्य
- ड्राफ्ट्समन: 2 पदे- 12 वी पास + ड्राप्ट्समन डिप्लोमा किंवा आयटीआय+ २ वर्षे कामाचा अनुभव
- सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG): 3 पदे -12 वी पास +ड्रायव्हिंग परवाना + २ वर्षे कामाचा अनुभव
- कंपोझिटर-कम प्रिंटर: 1 पद -12 वी पास +२ वर्षे कामाचा अनुभव
- सिनेमा प्रोजेक्शनिस्ट GDE-II: 1 पद -12 वी पास +२ वर्षे कामाचा अनुभव
- कूक: 14 पदे– 12वी पास +२ वर्षे कामाचा अनुभव किंवा आयटीआय+ २ वर्षे कामाचा अनुभव
- सुतारकाम: 2 पदे -12 वी पास +२ वर्षे कामाचा अनुभव किंवा आयटीआय+ २ वर्षे कामाचा अनुभव
- टीए बेकर आणि कन्फेक्शनर: 1 पद आयटीआय+ 1 वर्षे कामाचा अनुभव
- फायरमन: 2 पदे – 10 वी पास+ 1 वर्ष कामाचा अनुभव
- टीए प्रिंटिंग मशीन OPTR: 1 पद – ITI किंवा 10 वी + 1 वर्षे कामाचा अनुभव
- TA- सायकल दुरुस्ती: 2 पदे – ITI किंवा 10 वी + 1 वर्षे कामाचा अनुभव
- TA- बूट रिपेअरर: 1 पद – ITI किंवा 10 वी + 1 वर्षे कामाचा अनुभव
- मल्टी-टास्किंग स्टाफ – ऑफिस आणि ट्रेनिंग (MTS-O&T): 151 पदे – 10 वी
एकूण 198 पदे आहेत. भरतीसाठी आरक्षणनिहाय पदसंख्येची अधिक माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
नोकरीची संधी: मुंबई कस्टम्स झोन-१ मध्ये ड्रायव्हर पदाची भरती, १०वी पास उमेदवारांना मोठी संधी
NDA Recruitment 2024 वयोमर्यादा
अर्ज करण्या-या उमेदवाराचे किमान वय 18 आहे कमाल वयोमर्यादा 25 इतकी आहे. लोअर डिव्हीजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन या पदांसाठी किमान वयोमर्यादा 27 आहे.
NDA Bharti 2024 वेतन
निवडेलेल्या उमेदवारांना 18000 ते 81100 इतके वेतन मिळू शकेल. पदनिहाय वेतन वेगवेगळे आहे.
NDA Recruitment 2024 निवड प्रक्रिया
शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क(General Intelligence and Reasoning) आणि संख्यात्मक योग्यता आणि सामान्य इंग्रजी (Numerical Aptitude and General English) यांचा समावेश असेल. १०वी किंवा 12 वीच्या समकक्ष प्रश्न विचारले जातील. त्यानंतर उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. उमेदवारांची निवड फक्त लेखी परीक्षेच्या गुणांवरून केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात आवश्य पाहा.
नोकरी संधी : रेल्वेमध्ये लोको पायलट भरती, 5696 जागांसाठी होणार रिक्रुटमेंट
NDA Bharti 2024 महत्वाच्या तारखा-
एनडीए भरतीचा अर्ज भरण्यास सुुरुवात 27 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांमध्ये उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन एनडीएकडून करण्यात आले आहे.
NDA Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
जाहिरातीसाठी लिंक-
https://ndacivrect.gov.in/pdf/RECTADVT.PDF
https://ndacivrect.gov.in/pdf/GENINSTR.PDF
अर्ज करण्यासाठी लिंक