इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian Oil corporation Ltd ही भारतातली एक मोठी आणि फॉर्चुन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आय़टीआय (ITI), डिप्लोमा (Diploma) आणि पदवीधर उमेदवारांसाठी टेक्निकल अप्रेंटीस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिससाठी apprenticeship अर्ज मागवण्यात मागवण्यात येत आहेत.
Indian Oil corporation Ltd recruitment 2023
या भरतीमध्ये एकूण 1603 जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास 16 डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात.
सर्व प्रथम भरतीसाठी कोणते पद आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे हे जाणून घेऊयात.
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस jobs for ITI
विषय कोड- 107 ते 111
विषय कोड | ट्रेड | शैक्षणिक पात्रता |
107 | फिटर- | उमेदवार 10 वी पास असावा. संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराने NCVT/SCVT मान्यताप्राप्त दोन वर्ष कालावधी ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. |
108 | इलेक्ट्रिशिअन | |
109 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | |
110 | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | |
110 | मशिनिस्ट |
टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी काय निकष आहेत ते पाहूयात,
पदाचे नाव – टेक्निकल अप्रेंटिस, jobs for Diploma
विषय कोड- 101 ते 105
विषय कोड | डिप्लोमा विषय | शैक्षणिक पात्रता |
101 | मॅकेनिकल | तंत्रज्ञ शिकाऊ (मेकॅनिकल) – उमेदवाराने संबंधित विषयामध्ये 3 वर्षे पुणेवेळ डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवार 50 % गुण घेऊन पास झालेला असावा. EWS आणि OBC-NCL साठी आणि SC/ST/PwBD उमेदवार किमाण 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. |
102 | इलेक्ट्रिकल | |
103 | इन्स्ट्रुमेंटेशन | |
104 | सिव्हील | |
105 | इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स | |
106 | इलेक्ट्रॉनिक्स |
इंडियन ऑईल अप्रेंटीस भरतीमध्ये पदवीधर उमेदवारांना संधी आहे त्याचे निकष खालीलप्रमाणे
पदाचे नाव- ग्रॅज्युएट अप्रेंटिस Jobs for Graduates
विषय कोड-112 ते 116
विषय कोड | डिप्लोमा विषय | शैक्षणिक पात्रता |
101 | मॅकेनिकल | तंत्रज्ञ शिकाऊ (मेकॅनिकल) – उमेदवाराने संबंधित विषयामध्ये 3 वर्षे पुणेवेळ डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवार 50 % गुण घेऊन पास झालेला असावा. EWS आणि OBC-NCL साठी आणि SC/ST/PwBD उमेदवार किमाण 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. |
102 | इलेक्ट्रिकल | |
103 | इन्स्ट्रुमेंटेशन | |
104 | सिव्हील | |
105 | इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स | |
106 | इलेक्ट्रॉनिक्स |
पदाचे नाव आणि कोड- 112- पदवीधर शिकाऊ
उमेदवाराने BA/B. Com/B.Sc/BBA. यापैकी एका विषयामध्ये 50% गुणांसह पदवी घेतलेली असावी – सामान्य, EWS आणि OBC-NCL साठी किमान 50% गुणांसह कोणत्याही विषयातील नियमित पदवी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी..
पदाचे नाव आणि कोड-
113- ट्रेड अप्रेंटिस-डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर)
उमेदवार किमान 50% गुणांसह 12वी (परंतु पदवीपेक्षा कमी) आणि आरक्षित पदांसाठी SC/ST/PwBD उमेदवारांच्या बाबतीत OBC-NCL आणि 45% मान्यताप्राप्त संस्था/मंडळाकडून.
114 – ट्रेड अप्रेंटिस-डेटा एंट्री ऑपरेटर (कुशल प्रमाणपत्र धारक) –
उमेदवार 12 वी (परंतु पदवीपेक्षा कमी) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ चे कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
115- ट्रेड अप्रेंटिस-रिटेल सेल्स असोसिएट (फ्रेशर) –
इयत्ता 12 वी (परंतु पदवीपेक्षा कमी) किमाण 50% गुणांसह उत्तीर्ण
116- ट्रेड अप्रेंटिस-रिटेल सेल्स असोसिएट (कुशल प्रमाणपत्र धारक) – इयत्ता 12 वी (परंतु पदवीपेक्षा कमी) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.उमेदवारांकडे ‘रिटेल ट्रेनी असोसिएट’ चे कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Indian Oil recruitment अप्रेंटिससाठी नोंदणी
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांना एका वेळी एकाच ट्रेडसाठी अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अप्रेंटिस पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे. उमेदवारांनी तंत्रज्ञ/ट्रेड/ग्रॅज्युएट अप्रेंटिस म्हणून खालील पोर्टलपर नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी खालील वेबसाईटचा वापर करा.
a) ट्रेड अप्रेंटिस (ITI पास उमेदवारांसाठी)- http://apprenticeshipindia.org/candidate-registration
b) ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर आणि रिटेल सेल्स असोसिएट उमेदवारांसाठी- http://apprenticeshipindia.org/candidate-registration
c) तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमाधारकांसाठी) – https://nats.education.gov.in/student_register.php
D) पदवीधर प्रशिक्षणार्थी: https://nats.education.gov.in/student_register.php
यावेळी मिळालेला नोंदणी क्रमांक अर्ज करते वेळी भरायचा आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://www.iocl.com/apprenticeships या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया Indian Oil recruitment application
पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार 16 डिसेंबर 2023 (10:00 A.M.) ते 05 जानेवारी 2024 (P.M. 5.00) पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात त्यासाठी त्यांनी इंडियन ऑईलच्या कॉर्पोरेट वेबसाइटला भेट द्यायची आहे. https://www.iocl.com/ apprenticeships. केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
Indian Oil recruitment selection method निवड पद्धत:
1. उमेदवारांची निवड ही ऑनलाइन चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे आणि अधिसूचित पात्रता निकषांची पूर्ततेच्या आधारे केली जाईल.
2. ऑनलाइन चाचणी वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांसह घेतली जाईल (MCQ’s) मध्ये एका योग्य पर्यायासह चार पर्याय असतात. चाचणीसाठी संबंधित विषयातील तांत्रिक कौशल्य, क्वालिटेटीव्ह एप्टेट्यूड, तर्कक्षमता आणि इंग्रजी भाषा यांचा विषयांचा समावेश होतो.
Indian Oil recruitment age limit वयोमर्यादा-
उमेदवाराचे वय ३०.११.२०२३ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. वयाची अट SC/ST साठी ५ वर्ष तर OBC-NCLi साठी ३ वर्षे शिथिल करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपुर्वक वाचा.
शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी:
सर्व विषयांसाठी १२ महिने प्रशिक्षण कालावधी असणार आहे. अपवाद (ट्रेड अप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट- 6 महिने)