आयकर विभागामध्ये (Income Tax Department Recruitment 2023) आयकर निरीक्षक, लघुलेखक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट पदांची भरती होणार आहे. मुख्यत्वे खेळाडूंसाठी Recruitment for sportsperson ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. आयकर विभाग, मुंबई येथे २९१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील सविस्तर पाहूयात…
Income Tax Department Recruitment 2023 पदाचे नाव पद संख्या आणि वेतन
खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या भरतीमध्ये Recruitment for sportsperson पदांची तपशीलवार माहिती पाहूयात.
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या | वेतन |
1 | आयकर निरीक्षक (ITI) | 14 | 44,900-1,42,400 |
2 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 18 | 25,500-81,100 |
3 | कर सहाय्यक (TA) | 119 | 25,500-81,100 |
4 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 137 | 18,000-56,900 |
5 | कॅन्टीन अटेंडंट | 3 | 18,000-56,900 |
अर्ज करणारे खेळाडू उमेदवार आयकर निरीक्षक किंवा स्टेनोग्राफर ग्रेड II किंवा कर सहाय्यक किंवा मल्टी-टास्किंग स्टाफ किंवा कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी किंवा वरील सर्व पदांसाठी एकाच अर्जात अर्ज करू शकतात.
अधिसुचना पाहण्यासाठी अधिसुचना पाहण्यासाठी उमेदवारांनी सोबत दिलेल्या लिंकवर माहिती घ्यावी – https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf
Income Tax Department Recruitment वयोमर्यादा
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | आयकर निरीक्षक (ITI) | 18 ते 30 वर्षे |
2 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 18 ते 27 वर्षे |
3 | कर सहाय्यक (TA) | 18 ते 27 वर्षे |
4 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 18 ते 25 वर्षे |
5 | कॅन्टीन अटेंडंट | 18 ते 25 वर्षे |
गुणवंत खेळाडूंसाठी वयोमर्यादेत कमाल 5 वर्षांपर्यंत सुट दिली जाऊ शकते तर SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 10 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पाहावी.
शैक्षणिक पात्रता Income Tax Department Recruitment
खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
अ.क्र | पदाचे नाव | शैक्षणिक आणि इतर पात्रता |
1 | आयकर निरीक्षक (ITI) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता |
2 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 12 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य |
3 | कर सहाय्यक (TA) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता |
4 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 10 वी किंवा समतुल्य पास |
5 | कॅन्टीन अटेंडंट | 10 वी किंवा समकक्ष |
IT Department Recruitment for sportsperson अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज फी ₹२००/- आहे. उमेदवारानी फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे आणि त्याचा पुरावा अर्ज भरताना सादर करायचा आहे.
Income Tax Department Recruitment निवड प्रक्रिया
गुणवंत खेळाडूंच्या नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल आणि ट्रेनिंग ( DoPT) यांच्या प्राधान्यक्रमानुसार गुणवंत खेळाडूंची निवड केली जाईल. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी. या भरतीसाठी 65 क्रिडा प्रकारातील खेळाडू अर्ज करू शकतील त्याची माहिती जाहिरातीमध्ये सविस्तर दिली आहे.
Income Tax Department Recruitment महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 ही आहे.
Income Tax Department Recruitment अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी आयकर विभागाच्या – https://mumbai-itax-sportsrecr23.com या वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम नोंदणी करावी आणि त्यानंतर याच लिंकवर लॉगिन करून अर्ज करावा.