आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ITI job. रेल्वेमध्ये विविध ट्रेडसाठी अप्रेंटसशिप भरती होत आहे. रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेसाठी Railway recruitment ही भरती होत आहे. इचछुक उमेदवारांनी 14 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अप्रेंटसशिप भरतीची माहिती सविस्तर पाहूयात…
Railway recruitment for ITI 2023
भारतीय रेल्वेमध्ये करियर करण्यासाठी प्रयत्न करणा-या उमेदवारांसाठी खुशखबर..रेल्वेमध्ये तब्बल 3015 जागांवर भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात 15 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय, निवडप्रक्रिया याची माहिती खालील प्रमाणे.
ITI jobs- पदाची माहिती
पश्चिम मध्य रेल्वेमधील युनिट्स/वर्कशॉप्समध्ये अप्रेंटीस ऍक्ट 1961 नुसार भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अप्रेंटीशीपसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने 14 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. या भरतीद्वारे एकूण 3,015 पदे भरली जाणार आहेत. ट्रेडनुसार ही भरती असेल.
Railway recruitment 2023 शैक्षणिक पात्रता काय
अप्रेंटीशीपसाठी उमेदवार 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा 50 टक्के गुणांसह पास असावा. उमेदवाराने NCVT ITI उत्तीर्ण असावा. त्याचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षेत बसलेले उमेदवार आणि पात्रता परीक्षेचा निकाल प्रतीक्षेत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
ITI trades कोणत्या ट्रेडला संधी
या भरतीमध्ये ब्लॅक स्मिथ (फाउंड्रीमन) मशीनिस्ट, मेसन (बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्टर), पेंटर (सामान्य), प्लंबर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), वायरमन, रिसेप्शनिस्ट, हॉटेल क्लर्क, फ्रंट ऑफिस असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक सुतारकाम, संगणक ऑपरेटर सह प्रोग्रामिंग असिस्टंट, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटरया ट्रेडसाठी भरतो होणार आहे.
Railway recruitment 2023 वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांसाठी वर्योमर्यादा 05 वर्षे, तर OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा 03 वर्षे शिथिल करण्यात आली आहे. तर दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 10 वर्षे शिथिल करण्यात आली आहे.
Railway recruitment 2023 निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादी 10वीच्या परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समतुल्य (10+2 परीक्षा ) अधिक ITI/ट्रेड गुणांच्या आधारे तयार केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकमध्ये दिलेली जाहिरात काळजीपुर्वक पाहा.
Railway recruitment 2023 अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी www.wcr.indianrailways.gov.in भेट द्यायची आहे यानंतर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या नंतर पुढील क्रमाने टॅबवर क्लिक करा. About us-> Recruitment-> Railway Recruitment Cell-> Engagement of Act Apprentices for 2023-2 या क्रमाने जाऊन अर्ज भरायचा आहे.
https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ याच लिंकवर युनिटनुसार भरती केल्या जाणा-या ट्रेडची माहिती दिलेली आहे.(पान नंबर 6 ते 11)
आवश्यक कागदपत्र
अपुर्ण कागदपत्र किंवा चुकीचे कागदपत्र यामुळे तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो, त्यामुळे खालील कागदपत्रांची यादी नीट पाहा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- नमुना स्वाक्षरी.
- इयत्ता 10वीची गुणपत्रिका
- इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- SC/ST/OBC/EWS साठी जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- NCVT/SCVT द्वारे जारी केलेले ITI प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका.
ऑनलाईन अर्ज फी
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 136 रुपये आहे तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 36.00 इतके शुल्क भरावे लागेल. फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.