गुप्तहेर खाते म्हणजेच इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये करियर करण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे.Intelligence Bureau recruitment गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयबीमध्ये तब्बल 226 अधिका-यांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी – II/तंत्रज्ञ या पदांची भरती होणार आहे. या भरतीसंबंधीत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Intelligence Bureau recruitment 2023
केंद्रीय गृहमंत्रालायच्या इंटेलिजेंस ब्युरोनेसहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी – II/तंत्रज्ञ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक 23 डिसेंबर 2023 रोजी सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे. अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरणे आवश्यक आहे.
Intelligence Bureau recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी – II/तंत्रज्ञ Assistant Central Intelligence Officer Grade-II/Technical (ACIO-II/Tech) या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी 2021 किंवा 2022 किंवा 2023 यापैकी कोणत्याही वर्षात GATE मध्ये पात्रता कट-ऑफ गुण प्राप्त केलेले असले पाहिजेत. त्याचबरोबर उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान
किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी; सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेज/संस्थेतून विषयामध्ये B.E किंवा B.Tech असावा.
किंवा
उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स किंवा भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्ससह मास्टर्स किंवा कंप्युटर ऍप्लिकेशन विषयात मास्टर्स केलेले असावे.
Intelligence Bureau recruitment 2023 वयोमर्यादा-
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 12.01.2024 रोजी 18-27 वर्षे असावे. वयोमर्यादा SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.
Intelligence Bureau recruitment 2023 निवडप्रक्रिया-
उमेदवारांच्या गेट स्कोरनुसार मुलाखतीसाठी शॉर्टलीस्ट केले जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमध्ये उमेदवाराचे संबंधित क्षेत्रातील ज्ञान आणि कम्युनिकेशन स्क्रील यावर भर असेल. गेट स्कोर आणि मुलाखतीमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
Intelligence Bureau recruitment 2023 अर्ज कसा करावा आणि फी
अर्ज करण्यापूर्वी पदासाठी वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता पडताळून पाहा. त्यासाठी गृहमंत्रालयाच्या वेबसाईला भेट द्या. उमेदवार www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क नाही.
Intelligence Bureau recruitment 2023 वेतन किती असेल
निवडल्यास उमेदवारांना स्तर-7 नुसार वेतन मिळेल. वेतन प्रति महिना 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये असेल.
भारतीय गृहमंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्यावी. सोबत गृहमंत्रालयाच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच बरोबर जाहिरात पाहण्यासाठीची लिंकही दिलेली आहे. ती इच्छुकांनी काळजीपूर्वक पाहावी. शुभेच्छा…
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/86262/Index.html