BDL Recruitment 2024 संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ३६१ जागांची भरती होत आहे. भारत डायनेमिक्सने या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
Bharat Dynamics Limited recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प अभियंता PROJECT ENGINEER | मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ केमिकल/ पर्यावरण/ मेटलर्जी विषयमामध्ये BE/ B.Tech/ B.Sc Engg (4 वर्षे) / Integrated M.E./M.Tech प्रथम श्रेणी (60%) मध्ये उत्तीर्ण |
प्रकल्प अधिकारी Project Officer (Business Development) | मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीए MBA (मार्केटिंग / फॉरेन ट्रेड /सप्लाय चेन मॅनेजमेंट) मध्ये प्रथम श्रेणी (60%) किंवा समतुल्य मार्केटिंग किंवा सेल्स आणि मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन |
प्रकल्प अधिकारी (मानव संसाधन) | MBA/MSW/PG डिप्लोमा (02 वर्षे) मध्ये प्रथम श्रेणी (60%) किंवा समतुल्य अभ्यासक्रम |
प्रकल्प अधिकारी (वित्त) | CA/ICWA मध्ये उत्तीर्ण किंवा AIMA मान्यताप्राप्त संस्थेचा कोर्स / विद्यापीठ किंवा प्रथम श्रेणी (60%) एमबीए MBA (वित्त) मध्ये (2 वर्ष) किंवा 2 वर्षांचा वित्त शाखेतील पदव्युत्तर पदविका. |
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट | मॅकेनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / संगणक / सिव्हील / मेटलर्जी / केमिकल विषयातील ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा समतुल्य अभ्यासक्रम |
प्रकल्प सहाय्यक (वित्त) | B.Com/BBA(फायनान्स) किमान 6 महिन्यांच्या संगणकासह ऑफिस ऍप्लिकेशन्समधील कोर्स |
प्रकल्प सहाय्यक (मानव संसाधन) Project Assistant (Human Resource) | BBA आणि समकक्ष आणि किमान 6 ऑफिस ऍप्लिकेशन्स (किंवा) कोणताही संगणक अभ्यासक्रम |
प्रकल्प व्यापार सहाय्यक Project Trade Assistant | ITI ट्रेड- फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीशियन /मशीनिस्ट / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रो प्लेटिंग / संगणक / प्लंबर मिल राइट / डिझेल मेकॅनिक / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / /रेडिओ मेकॅनिक |
प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंट Project Office Assistant | कॉम्प्युटर अँड कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा (DCCP)/ डीसीपी कोर्स |
BDL Recruitment 2024 वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय किमान 28 वर्षे असावे. SC आणि ST साठी 05 वर्षे तर OBC-NCL साठी 03 वर्षे, PwBD (UR) साठी 05 वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
BDL Recruitment 2024 अर्ज शुल्क :
प्रकल्प अभियंता / प्रकल्प अधिकारी पदासाठी 300/- रुपये तर
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/ प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ प्रोजेक्ट असिस्टंट/ प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंट या पदांसाठी 200/- रुपये अर्ज शुल्क असेल.
नोकरी संधी- रेल्वेमध्ये लोको पायलट भरती, 5696 जागांसाठी होणार रिक्रुटमेंट
Bharat Dynamics Limited recruitment : वेतन
उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी होणार आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी वेतनवाढ होईल. प्रकल्प अभियंता/प्रकल्प अधिकारी पदासाठी 30,000/- ते 39,000/- ,
प्रोजेक्ट डिप्लोमा/प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट पदासाठी – 25,000/- ते 29,500/-
प्रोजेक्ट असिस्टंट/ प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंट पदासाठी– 23,000/- ते 27,500/- इतके वेतन असेल.
BDL Recruitment 2024 : अर्ज कसा करावा ?
उमेदवारांनी बीडीएलच्या अधिकृत वेबसाईटवर www.bdl-india.in नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी 24.01.2024 पासून सुरू झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४.०२.२०२४ ही आहे.
नोकरी संधी- सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण…तुम्ही अर्ज केला का?
BDL Recruitment 2024: मुलाखत कधी होईल ?
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मुलाखतीचा राऊंड होईल. यामध्ये उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीसाठी ठरवेली वेळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती इच्छुकांनी पाहावी.
Bharat Dynamics Limited recruitment : निवड प्रक्रिया-
उमेदवाराला त्याच्या विषयामध्ये मिळालेले गुण, अनुभव आणि मुलाखत यावर मेरिट लिस्ट तयार केली आणि उमेदवारांची निवड होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत याची माहिती घेण्यासाठी सोबत दिलेली जाहिरात पाहावी.
महत्वाच्या लिंक्स-
बीडीएलचे करियर पेज – https://bdl-india.in/careers-page