बॅंकिंग क्षेत्रात करियरची तयारी करणा-या पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती.. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 600 जागांची भरती होत आहे. ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ (Specialist Officers) या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याच भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात.
Union Bank of India Bharti 2024
सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची बॅक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 21 विविध पदांची भरती होत आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत बेवसाईटवर http://www.unionbankofindia.co.in ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.
Union Bank of India Bharti 2024: पदे आणि शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक-आयटी Chief Manager-IT– 05 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech. कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / आयटी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स एन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स MCA
किंवा M. Tech./ M.Sc.- कम्प्युटर सायन्स / IT/ इलेक्ट्रॉनिक्स एन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उमेदवार पदवी अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
नोकरी संधीः PDEA PUNE BHARTI 2024 पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये (PDEA) भरती, आजच ऑनलाईन अर्ज करा…
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी Senior Manager – 42 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech. कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / आयटी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उमेदवार पदवी अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
व्यवस्थापक-आयटी – 04 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech. कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / आयटी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उमेदवार पदवी अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
व्यवस्थापक – 447 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर, MBA, LLM, BE/B.Tech
Union Bank of India Bharti 2024 वयोमर्यादा-
व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय किमान 25 तर कमाल 35 वर्ष असावे तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी किमान वय 20 तर कमाल 30 वर्षे इतके असावे. राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
Union Bank of India Bharti 2024 अर्ज फी :
GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी 850 रुपये तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज फी असणार आहे.
Union Bank of India Bharti 2024 निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असणार आहे. अर्ज संख्या आणि पात्र उमेदवार यांच्या संख्येवरून ठरवण्यात येईल.
Union Bank of India Bharti 2024: अर्ज कोठे करावा?
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकेच्या www.unionbankofindia.co.in वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘रिक्रूटमेंट्स’ पेजवर जाऊन पद निवडावे आणि अर्ज पुर्ण भरावा.
Union Bank of India Bharti 2024 वेतन-
निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळेल.
मुख्य व्यवस्थापक यांची वेतनश्रेणी- 76010-2220/4-84890-2500/2-89890
वरिष्ठ व्यवस्थापक यांची वेतनश्रेणी 63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापकयांची वेतनश्रेणी 48170-1740/1-49910-1990/10-69810