C-DAC Recruitment 2024: इंजिनिअर्ससाठी नोकरीसंदर्भात महत्वाची माहिती..सी-डॅकमध्ये (C-DAC) सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, ऑफिसर पदांसाठी भरती होत आहे. यावेळी 325 जागा भरल्या जाणार आहेत. सी-डॅकच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
C-DAC Recruitment 2024 पदे आणि शैक्षणिक पात्रता
1) प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर: 45 पदे
शैक्षणिक पात्रता- BE/B-Tech. किंवा MSC/MCA किंवा ME/M.Tech किंवा संबंधित विषयात पीएच.डी
2) प्रोजेक्ट इंजिनिअर /फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर: 75 पदे
शैक्षणिक पात्रता- BE/B-Tech. किंवा MSC/MCA किंवा ME/M.Tech किंवा संबंधित विषयात पीएच.डी तसेच 1-4 वर्षांचा अनुभव
3) प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (फ्रेशर): 75 पदे
शैक्षणिक पात्रता- BE/B-Tech. किंवा MSC/MCA किंवा ME/M.Tech किंवा संबंधित विषयात पीएच.डी
4) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोड्यूसर सर्विस आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक: 15 पदे
शैक्षणिक पात्रता- BE/B-Tech. किंवा MSC/MCA किंवा ME/M.Tech किंवा संबंधित विषयात पीएच.डी तसेच 9-15 वर्षांचा अनुभव आवश्यक
5) प्रोजेक्ट ऑफिसर : 5 पदे
शैक्षणिक पात्रता – एमबीए(MBA) तसेच 3 वर्षांचा अनुभव
6) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ: 9 पदे
शैक्षणिक पात्रता- पदवी/पदव्युत्तर कोणतीही शाखा 50 % गुणांसह उत्तीर्ण
हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर
बी.कॉम/एम.कॉम./एम.बी.ए
उमेदवारास 1-3 वर्षांचा अनुभव असावा.
7) प्रोजेक्ट टेक्निशियन: 1 पद.
कंप्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी / कंप्युटर ऍप्लिकेशन किंवा संबंधित क्षेत्रातील कामाचा 1 वर्षांचा अनुभव
किंवा इंजिनिअरींग / कंप्युटर ऍप्लिकेशन डिप्लोमा आणि 3 वर्षांचा अनुभव
8) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोड्यूसर. सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी: 100 पदे
BE/B-Tech. किंवा MSC/MCA किंवा ME/M.Tech किंवा संबंधित विषयात पीएच.डी तसेच 3-7 वर्षांचा अनुभव आवश्यक
C-DAC Recruitment 2024 वयोमर्यादा-
प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राखीव जागांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी जाहिरातीमधील तपशील पाहावा.
नोकरी संधी- यूनियन बॅकेत 606 जागांची भरती, पदवीधर, MBA, BE/B.TECH उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी
C-DAC Recruitment 2024 निवड प्रक्रिया
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची पुढिल प्रकियेसाठी (स्क्रीनिंग-इन ) निवड होईल. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा /कौशल्य चाचणी/ मुलाखत असे टप्पे असतील. निवडलेल्या उमेदवारांना इमेलवरून संपर्क करण्यात येईल.
C-DAC Recruitment 2024 अर्ज फी
सी-डॅकच्या भरतीचे वैशिष्टे म्हणजे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही.
नोकरी संधी- भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअर्सची भरती, 55 जागांसाठी मागवले अर्ज
C-DAC Recruitment 2024 वेतन आणि कालावधी
सी-डॅककडून करण्यात येणारी ही भरती 3 वर्षांकरिता कऱण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कामगिरी आणि सीडॅककडे असलेल्या प्रोजेक्ट नुसार कालावधीमध्ये वाढ करण्यात येऊ शकते
प्रत्येक पदासाठी वेतन निश्चित करण्यात आले आहे. त्याची रेंज ३ ते 22 लाख प्रतीवर्ष याप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवारांनी सीडॅकच्या वेवसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.
C-DAC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुबारी 2024 आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंक्स पाहाव्यात
सीडॅक बेवसाईट- https://cdac.in/index.aspx
भरती माहिती- https://careers.cdac.in/advt-details/CORP-2912024-5UTU8