महाराष्ट्र शासनाची शिक्षक भरतीची teacher recruitment प्रक्रिया केव्हा सुरु होईल माहित नाही. मात्र भूतानच्या रॉयल सरकारने बी.एड झालेल्या शिक्षकांसाठी भरती सुरु केलीय.
भारत सरकारच्या एडसिलमार्फत EdCIL (India) Limited ही भरती होणार आहे. भूतान सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाकडून अंतर्गत उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती होत आहे.
PGT teacher recruitment in Bhutan 2024
EdCIL (इंडिया) लिमिटेड ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. याच एडसिलचा मार्फत भूतान सरकारसाठी STEM (Science, technology, engineering, and mathematics) शिक्षकांची भरती होणार आहे . भूतानमधील उच्च माध्यमिक शाळांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठीच भारतातील पोस्ट ग्रज्युएट शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज खालील विषयांसाठी मागवण्यात येत आहेत
PGT teacher recruitment पद संख्या
अन क्र | पद आणि विषय | जागा |
1 | गणित Mathematics | 35 |
2 | आयसीटी/ कंप्युटर सायन्स/आयटी ICT/Computer Science/IT | 28 |
3 | केमिस्ट्री Chemistry | 19 |
4 | फिजिक्स Physics | 18 |
PGT teacher recruitment शैक्षणिक पात्रता-
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी. त्यासबरोबर उमेदवार बी.एड असावा. इंग्रजी भाषेत शिकवण्यात प्रवीणता आवश्यक आहे त्याचबरोबर 11वी आणि 12वीला शिकवण्याचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
PGT teacher recruitment अर्ज कोठे कराल?
उमेदवारांनी EdCIL वेबसाइट http://edcilteacherrecruitment.com द्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
नोकरी माहिती- सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनिअर्सची भरती, महिलांना 30 टक्के आरक्षण…तुम्ही अर्ज केला का?
PGT teacher recruitment वेतन किती?
निवड झालेल्या शिक्षकांना एकूण 1,40,000 प्रति महिना इतके वेतन दिले जाईल. पोस्टिंगचा कालावधी किमान 2 वर्षांचा असेल आणि शिक्षकांना भूतानमध्ये कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. शिक्षकांना वर्क परमिटसाठी भूतान सरकारकडून देण्यात येईल. त्याचप्रमाणे स्थानिक नियमांनुसार सर्व भत्ते मिळतील.
PGT teacher recruitment in Bhutan 2024 निवड प्रकीया
उमेदवारासाठी मुलाखतीच्या दोन फेऱ्या असणार आहेत. प्राथमिक ऑनलाइन मुलाखत त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत होईल. भारतीय अधिकारी आणि भूतान सरकारचे अधिकारी असलेले एक पॅनेल ऑनलाइन मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवड करेल.
ईडीसीआयएल/एमईए/आरजीओबीने EdCIL/ MEA/ RGoB यांच्याकडून प्राथमिक तपासणीनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
उमेदवाराची पात्रता, योग्यता, अनुभवाच्या आधारे उमेदवारांचे शॉर्ट-लिस्टिंग होईल. त्यानंतर उमेदवारांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
नोकरी माहिती– गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार
PGT teacher recruitment in Bhutan 2024 आवश्यक कागदपत्र
अर्ज केलेल्या उमेदवारच्या ईमेल आयडीवर अपडेट्स पाठवले जातील. वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रता तपशील जसे की दहावी (10 वी), बारावी (१२वी) च्या मार्कशीट्स, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम मार्कशीट्स द्यावी. अनुभव व मागील पगार यांची माहिती उमेदवारांना भरायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. त्यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्व निकषात बसत असाल तर आजच अर्ज करा.
महत्वाची लिंक- http://edcilteacherrecruitment.com