इंजिनिअर, डिप्लोमा आणि जर्नालिझमची डिग्री घेतलेल्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वेमध्ये अप्रेंटिशीपची संधी Apprentice applications  invited by KonkanRailway Corporation Limited (KRCL)

By Admin

रेल्वेभरतीची तयारी करणा-या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी…कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून [Konkan Railway Corporation Limited] विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे  त्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शिकाऊ उमेदवार पदांची सविस्तर माहिती

1.पदवीधर एप्रेंटिस (Graduate Apprentices) –  या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची (BE/B.Tech) पदवी असावी. उमेदवाराने सिव्हील इंजिनियरिंग Civil Engineering/इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग Electrical Engineering:/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग Electronics Engineering:/ मॅकेनिकल इंजिनीअरिंग  Mechanical Engineering मध्ये पदवी मिळवलेली असावी

२. टेक्निकल (डिप्लोमा) एप्रेंटीस– या पदासाठी उमेदवार इंजिनीअरिंग पदविका उत्तीर्ण असावा.  उमेदवाराने सिव्हील इंजिनीअरिंग Civil Engineering/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग Electrical Engineering:/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग Electronics Engineering:/ मॅकेनिकल इंजिनीअरिंग  Mechanical Engineering मध्ये पदविका मिळवलेली असावी.

३. पदवीधर एप्रेंटिस- (कॅटेगरी-III)- या पदासाठी उमेदवाराने कला, वाणिज्य आणि सायन्स अभ्यासक्रमाची पदवी मिळवलेली असावी. त्याचप्रमाणे जर्नालिझम एन्ड मास कम्युनिकेशन विषयामध्ये पदवीधर असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

जागांचा तपशील आणि पदसंख्या details of Apprentices application

  • सिव्हील इंजिनियरिंग Civil Engineering-30 जागा
  • इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग Electrical Engineering: 20 जागा
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग Electronics Engineering: 10 जागा
  • मॅकेनिकल इंजिनीअरिंग  Mechanical Engineering: 10 जागा
  • डिप्लोमा सिव्हीलDiploma (Civil) 30 जागा
  • डिप्लोमा इलेक्ट्रीकलDiploma (Electrical) 20 जागा
  • डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स Diploma (Electronics) 10 जागा
  • डिप्लोमा मॅकेनिकल Diploma (Mechanical) 20 जागा
  • पदवीधर General Stream Graduates 30 जागा

अर्ज कसा करावा? How to apply for konkanrailway post

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. यावेळी मिळालेला नोंदणी क्रमांक (NATS ID) महत्वाचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://wps.konkanrailway.com/nats/portal या वेबसाईट भेट द्यायची आहे. अर्ज फक्त कोकण रेल्वेच्या Portal द्वारेच स्वीकारले जातील. अधिक माहिती www.konkanrailway.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

वयाची अट :

01 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.  उमेदवाराची जन्मतारिख 01.09.1998 ते  01.09.2005 या दरम्यान असावी. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना  – 05 वर्षे तर  OBC प्रवर्गातील उमेदवारांना  03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

शुल्क :

100/- रुपये [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला – शुल्क नाही]

 

वेतनमान (Stipend) :

पदवीधर पदवीधर एप्रेंटिस  9,000/- रुपये तर टेक्निकल एप्रेंटीस पदासाठी 8000रुपये वेतनमान असेल.

 

निवडप्रक्रीया-

उमेदवारांच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावली जाणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2023 आहे. मित्रांनो शेवटच्या दिवसाची वाट न पाहाता आजच अर्ज करा. मुळ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications