RITES Limited Recruitment 2024
रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये (RITES Limited ) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे.
RITES Limited, एक नवरत्न आणि शेड्यूल ‘A’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत 26 एप्रिल 1974 रोजी स्थापन करण्यात आली आहे. RITES Limited ही एक अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे. ही संस्था वाहतुकीच्या संबंधित पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सेवेमध्ये काम करते.
पदाचे नाव आणि रिक्त पदांची माहिती
- पदवीधर अप्रेंटिससाठी एकून १६० जागा आहेत. त्यापैकी इंजिनिअरिंग डिग्री होल्डरसाठी 117 जागा आहेत. नॉन इंजिनिअरिंग पदवीसाठी 43 जागा आहेत.
- डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी २८ जागा आहेत.
- ट्रेड अप्रेंटिस (ITI) पदाच्या एकून ६९ जागांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रतेचे निकष-
पदवीधर अप्रेंटिस : या पदासाठी इंजिनिअरिंग डिग्री आणि पदवीधारक अर्ज करु शकतात. उमेदवाराने सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग पदवी मिळवलेली असावी किंवा
उमेदवार B.A/ BBA/ B.Com. विषयामध्ये पदवीधर असावा.
डिप्लोमा अप्रेंटिस : पदासाठी उमेदवार सिव्हिल /इलेक्ट्रिकल /सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात ६० टक्केगुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
ट्रेड अप्रेंटिस : उमेदवाराने सिव्हिल/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ टर्नर/ प्लंबर/ Cad ऑपरेटर/ ड्राफ्ट्समन विषयात ६० टक्केगुणांसह ITI पास केलेला असावा.
अर्ज कसा करावा ?
- अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा उमेदवारांनी राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी Https://Nats.Education.Gov.In/Student_Type.Php; या वेबसाईटला भेट द्यावी. तर ITI पास किंवा पदवीधर BA/BBA/B.Com उत्तीर्ण उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल www.apprenticeshipindia.Gov.In. येथे नोंदणी केलेली पाहिजे.
- उमेदवाराने नोंदणी केल्या नंतर NATS/NAPS पोर्टलवरच अप्रेंटीसशीपसाठी “RITES Limited” ची निवड करून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवरील जाहिरात पाहा. Https://Rites.Com/Upload/Career/Advertisement-Apprentices-Rites-011223_Pdf-2023-Dec-01-17-34-42.Pdf
- अर्ज केल्यानंतर उमेदवाराने Https://Forms.Gle/Vswvj6Y1Wcygvjfha या गुगल फॉर्मवर कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करायची आहेत. यामध्ये सर्व सेमिस्टर / वर्षांची गुणपत्रिका आणि पदवी / डिप्लोमा / आयटीआयचे अंतिम उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, ओळखपत्र, जातीचा दाखला आणि EWS प्रमाणपत्र (EWS उमेदवारांसाठी) याचा समावेश होतो.
अर्ज करण्यासाठी फी
रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये (RITES Limited ) अंतर्गत अप्रेंटस भरतीसाठी कोणतीही फी नाही.
निवड प्रक्रिया कशी आहे?
उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. निवड प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक देशात कोणत्याही ठिकाणी केली जाईल.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ डिसेंबर २०२३ रोजी झाली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे.
महत्वाच्या बेवसाईट
Rites Limited website- https://rites.com/
Detail Advertisement- https://Rites.Com/Upload/Career/Advertisement-Apprentices-Rites-011223_Pdf-2023-Dec-01-17-34-42.Pdf