भारतीय आतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO) आय़टीआय पास उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. इस्त्रोमध्ये टेक्निशियन – बी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदावारांना सातव्या वेतन आयोगाच्या पे स्केलनुसार पगार मिळणार आहे.
ISRO Recruitment 2023इस्रो टेक्निशिअन भरती 2023
इस्त्रोमध्ये टेक्निशियन-बी या पदासाठी भरती होत आहे. यासाठीची नोंदणी लिंक 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. टेक्निशियन पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. एकूण 54 पदे भरण्यात येणार आहेत.
ISRO Recruitment 2023 कोण अर्ज करू शकतो?
इस्त्रोच्या अंतर्गत येणा-या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटरसाठी National Remote Sensing Centre (NRSC) ही भरतो होणार आहे. उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आयटीआय (NCVT) उत्तीर्ण असावा.
ISRO Recruitment 2023पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन – बी – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : या पदासाठी उमेदवार SSC पास असावा तसेच त्याच्याकडे NCVT मधून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा.
टेक्निशियन – बी इलेक्ट्रिकल : या पदासाठी उमेदवार SSC पास असावा तसेच त्याच्याकडे NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा.
टेक्निशियन – बी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : या पदासाठी उमेदवार SSC आणि आयटीआय पास असावा. उमेदवार इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा.
टेक्निशियन – बी -फोटोग्राफी: दहावी पास आणि डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतो.
टेक्निशियन – बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास, तसेच NCVT मधून डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा.
ISRO Recruitment 2023: वयोमर्यादा
टेक्निशिअन पदासाठी उमेदवार किमान 18 ते कमाल 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षणाच्या नियमानुसार SC/ST उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सुट दिली जाईल.
ISRO Recruitment 2023 : निवडप्रक्रिया
उमेदवारांची निवड ही लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे करण्यात येईल. उमेदवारांचे संबंधित ट्रेडविषयी असलेल्या सखोल ज्ञानाचा कस या परिक्षेमध्ये लागणार आहे. लेखी परीक्षा एकूण 90 मिनीटांची असेल यामध्ये 80 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतील, यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. चुकीच्या प्रतेक उत्तरांसाठी 0.33 गुण वजा केले जातील तर योग्य उत्तरास एक गुण दिला जाईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत ८० पैकी किमान 32 गुण आणि कौशल्य चाचणीत 100 पैकी 50 गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणा-या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी हैदराबाद येथे बोलावले जाईल.
कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या परीक्षा केंद्राची निवड करावी. इच्छुक उमेदवारांनी https://www.nrsc.gov.in/sites/default/files/pdf/Careers/NRSC-RMT-4-2023-dated-09122023.pdf या बेवसाईटला भेट द्यावी.
ऑनलाईनअर्ज शुल्क
प्रत्येक अर्जासाठी ₹100/- (नॉन-रिफंडेबल) अर्ज फी आहे. तथापि, सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज ₹ 500/- भरावे लागतील. प्रक्रिया शुल्क फक्त लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनाच परत केले जाईल.
वेतन तपशील
टेक्निशिन बी या पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या पे स्केलप्रमाणे २१७०० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन मिळेल. सोबतच अनेक भत्तेही दिले जाणार आहेत.
अर्ज कसा करावा?
टेक्निशियन-बी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.nrsc.gov.in/ या बेवसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराने करियर (Career) किंवा अनाऊंसमेंट (Announcements) या पर्यायावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याचीही लिंक सोबत दिली आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/86205/Index.html
महत्वाच्या लिंक्स
2.htttps://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1111849541147980728929.pdf
तर मित्रांनो वाट कसली पाहताय आजच अर्ज करा…