बॅक ऑफ बडोदामध्ये सिनिअर मॅनेजर पदासाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी Bank Of Baroda Recruitment for Senior Manager  2023

Bank Of Baroda Recruitment for Senior Manager 2023:

बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर मॅनेजर या पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. सीनिअर मॅनेजर (Senior Manager) पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निवड प्रक्रिया कशी आहे ते सविस्तर पाहुयात.

Bank Of Baroda Recruitment 2023

देशातील महत्वाची आणि मोठी बॅक असलेल्या बॅक ऑफ बडोदामध्ये २५० सिनिअर मॅनेजर पदाचीं भरती होणार आहे. सिनिअर मॅनेजर पद रेग्युलर बेसिसवर भरले जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज बँक ऑफ बडोदामध्ये अधिकृत वेबसाइटच्या (bankofbaroda.in) माध्यामातून स्वीकारले जाणार आहेत. उमेदवार २६ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

Bank Of Baroda Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता

अर्जदार हा पदवधीर असावा, त्याने मान्यता प्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी मिळवलेली असावी. सिनिअर मॅनेजर पदासाठी उमेदवारास रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजर क्षेत्रात आठ वर्षांचा अनुभव असला पाहिजे. जर उमेदवार MBA किंवा पोस्ट ग्रज्युएट असेल तर त्याला 6 वर्षांचा अनुभव असावा.

BOB Recruitment 2023: वयोमर्यादा

सिनिअर मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२३ रोजी कमीत कमी वय २८ आणि जास्तीत जास्त वय ३७ असावे. वयोमर्यादेची अट आरक्षणाच्या नियमानुसार शिथिल करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन वयोमर्यादेचे निकष तपासावेत.

Reservation in Posts:

सिनिअर मॅनेजर पदाच्या एकूण 250 जागांवर भरती होणार आहे. या पदांची प्रवर्गानुसार वर्गवारी अशी असेल.A close-up of a tableDescription automatically generated

BOB Recruitment 2023: अर्ज शुल्क

सिनिअर मॅनेजर पदाचा अर्ज करण्यासाठी सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये तर SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागतील.  अर्जाची फीसोबत टॅक्स आणि पेमेंट गेटवे चार्ज उमेदवाराला भरावा लागेल. पैसे भरण्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन पद्धती वापरता येईल.  

BOB Recruitment 2023: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक चाचणी किंवा पुढील निवड प्रक्रियेसाठी योग्य मानल्या जाणार्‍या कोणत्याही चाचणीचा समावेश असू शकतो.ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गट चर्चा, मुलाखत घेतली जाईल. BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. त्याची माहिती बँकेकडून वेळोवेळी उमेदवारांना दिली जाईल.

BOB Recruitment 2023 ऑनलाईन टेस्ट कशी असेल?

ऑनलाईन टेस्टसाठी रिझनिंग, इंग्रजी भाषा, क्वालिटेटीव्ह ऍप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज हे विषय असतील. एकूण 225 गुणांसाठी 150 प्रश्न विचारले जातील. टेस्टसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना त्याचे परीक्षा केंद्र निवडायचे आहे.A table with numbers and lettersDescription automatically generated

BOB Recruitment 2023  पोस्टिंगचे ठिकाण आणि वेतन ?

पोस्टिंगचे ठिकाण बँकेच्या वेळोवेळी आवश्यकतेनुसार असेल. उमेदवारांना भारतातील त्याच्या कोणत्याही कार्यालयात/शाखेत ठेवले जाईल.

वेतनमान (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) MMG/S-III : रु. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230 इतके असेल. त्याचबरोबर नियमानुसार लागू असलेले सर्व भत्ते निवड झालेल्या उमेदवारांना मिळतील.

BOB Recruitment 2023 अर्ज कोठे करावा?

उमेदवारांनी बॅक ऑफ बडोदाच्या बेवसाईटला भेट द्यावी. त्यानंतर करियर ऑप्शन निवडावा आणि सिनिअर मॅनेजर पोस्टवर जाऊन माहिती पाहावी आणि ऑनलाईन अर्ज करावा. त्याची लिंक सोबत दिली आहे.

https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-senior-manager-msme-relationship-on-regular-basis-in-msme-vertical

Leave a Comment