HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 पुण्यातील हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये इंजिनिअरींग, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी भरती होत आहे. एप्रेंटीशीप(शिकावू उमेदवार) पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात.
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये फ्रेशर्ससाठी 90 जागांची भरती होत आहे. केमिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा तसेच पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ग्रॅज्युएट एप्रेंटीस- पदसंख्या- 20 (खुला गट-10, एससी-03, एसटी-01, ओबीसी-06)
उमेदवार केमिकल किंवा इलेक्ट्रीकल इं जिनिअर असावा.
टेक्निकल एप्रेंटीस- पदसंख्या- 20 (खुला गट-10, एससी-03, एसटी-03, ओबीसी-05)
उमेदवार केमिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
जनलर स्ट्रीम एप्रेंटीस- पदसंख्या- 50 (खुला गट-26, एससी-07, एसटी-03, ओबीसी-14)
या पदासाठी उमेदवार,BA, BCom, BBA, B.Sc, BCA, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यापैकी कोणतीही एक पदवीधारक असावा.
सुचना- वरील पदांसाठी फ्रेशर्स उमेदवारांचा विचार केला जाईल. उमेदवार उत्तीर्ण झाल्यापासून 4 वर्षांपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहे. इंजिनियरिंग झालेल्या उमेदवारास नोकरीचा किंवा प्रशिक्षणाचा एक वर्ष किंवा जास्त अनुभव असल्यास तो अर्ज करण्यास अपात्र आहे.
नोकरी संधी – BE/B.TECH, MBA उमेदवारांसाठी सीडॅकमध्ये मोठी संधी, 325 जागांची भरती
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 निवड प्रक्रिया
उमेदवाराला अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामधील निवडलेल्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यासाठी बोलावले जाईल.
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 अर्ज कसा कराल ?
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. संपूर्ण भरलेला अर्ज पोस्टाने कागदपत्रासह पाठवायचा आहे.
अर्जाचा विहित नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे.
https://munitionsindia.in/wp-content/uploads/HEF-advt-01-02-2024.pdf
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता?
सीलबंद लिफाफ्यावर “Application for Engagement as Graduate/Diploma apprentices” शीर्षकासह पाठवावे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज/अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता-
THE GENERAL MANAGER,
HIGH EXPLOSIVE FACTORY,
KHADAKI, PUNE-411003
(MAHARASHTRA)
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 – स्टायपेंड
अभियांत्रिकी/सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थीना रु. 9000/- प्रति महिना
डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ उमेदवार रु. 8000/- प्रति महिना
HIGH EXPLOSIVES FACTORY BHARTI 2024 अर्जाची शेवटची तारीख
हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणे येथे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. अर्जासोबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा तपशील जाहिरातीमध्ये दिलेला आहे. तो इच्छुक उमेदवारांनी पाहावा.