PMC Junior Engineer (Civil) Bharti: पुणे महापालिकेने नोकरीच्या शोधात असलेल्या सिव्हील इंजिनिअरसाठी नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. पुणे महानगरपालिकेत ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) पदाची भरती होणार आहे. तब्बल ११३ जागा भरल्या जाणार आहेत. त्याची जाहिरात महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
PMC Junior Engineer (Civil) Bharti 2024
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये नोकरी करण्याची संधी सिव्हील इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. पुणे महापालिकेमध्ये ज्युनिअर सिव्हील इंजिनिअर पदे भरली जाणार आहेत PMC Junior Engineer (Civil) Bharti. ही पदे सरळ सेवेने भरण्यात येत आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज पुणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी उमेदवारांनी https://www.pmc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
PMC Junior Engineer (Civil) Bharti शैक्षणिक पात्रता
पुणे महापालिकेमध्ये अभियांत्रिकी सेवा श्रेणी-३ संवर्गात ही भरती होत आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) शाखेची पुर्णवेळ पदवी किंवा पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
PMC Junior Engineer (Civil) Bharti वयोमर्यादा
इच्छुक उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादमध्ये 5 वर्षे दर दिव्यांग, माजी सैनिकांना 7 वर्षे सवलत दिली जाईल.
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती. 4थी पास ते पदवीधर सर्वाना संधी
PMC Recruitment 2024 परीक्षा
उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाची असेल. परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचे 60 प्रश्न तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित 40 प्रश्न विचारले जातील. एकूण 200 गुणांची परीक्षा असेल त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल.
परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ही सर्व माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल तसेच महापालिकेच्या बेवसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
PMC Recruitment 2024 निवडप्रक्रीया
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. ज्या उमेदवारांना 45% त्यांचाच समावेश गुणवत्ता यादीमध्ये लागेल. उमेदवारांची मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
PMC Junior Engineer (Civil) Bharti अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. 1000 तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900 उमेदवार शुल्क भरावे लागतील. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग, MBA झालेल्या उमेदवारांना मोठी संधी, 11 लाखांचे पॅकेज मिळणार
PMC Junior Engineer (Civil) Bharti वेतन
निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. वेतन श्रेणी s-14 नुसार 38000- 122800 इतके वेतन असणार आहे.
PMC Recruitment 2024 अर्ज कोठे करायचा?
अर्ज करण्याची उमेदवारांनी https://www.pmc.gov.in/ वेबसाईटला भेट देऊन सेवाभरती 2024 मध्ये दिलेल्या लिंकवर अर्ज भरायचा आहे. किंवा https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या लिंकवर जाऊन अर्ज भरायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना आवश्यक असलेली कागदपत्रांची माहिती पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती वाचावी आणि मगच अर्ज करावा.
PMC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा ?
महापालिकेच्या वेबसाईटवर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे . अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता आजच फॉर्म भरावा.
PMC Recruitment 2024 – महत्वाच्या लिंक्स
जाहिरात- https://www.pmc.gov.in/recruitment/files/Final_Advertisment_2024.pdf
अर्ज करण्यासाठी लिंक-