PDEA Pune Bharti 2024: पुणे जिल्हातील सर्वात जुण्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये (Pune District Education Association- PDEA) भरती होत आहे. याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ९ पदांच्या १७ जागा भरल्या जाणार आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये होत असलेल्या भरतीचे डिटेल्स पाहूयात.
PDEA Pune Bharti 2024: पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
- रजिस्ट्रार(Registrar) –१ जागा – उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असावे तसेच त्याला शिक्षण क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव असावा.
- कायदा अधिकारी(Law officer) – एलएलबी/एलएलएम उत्तीर्ण असावा. शिक्षण क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा न्यायालयीन अनुभव असावा.
- प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी (Training and Placement officer)– बीई/एमई BE/ME, MBA तसेच तीन वर्षांचा अनुभव
- कॉम्प्युटर सिस्टिम ऍडमिनिस्टर(Computer System Administrator) -. बी.इ कॉम्प्युटर/ एम.एस.सी. / एम. सी. ए. तसेच शैक्षणिक क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
- कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनिअर (Computer Hardware and Networking Engineer) – बी.सी. ए./ बी.सी. एस. तसेच क्षेत्रात शिक्षण आवश्यक. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग सर्टिफिकेट कोर्स आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक
- डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि एडिटर (Digital Studio Opertop and editor)– पदवी किंवा डिप्लोमा तसेच ऑडिओ/व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग संबंधित क्षेत्रात किमान वर्षाचा अनुभव असावा.
- सहायक लघुलेखक (Assistant Stenographer) – उमेदवार पदवीधर असावा. मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
- लेखा लिपिक ( Accounting Clerk) – बी.कॉम/एम.कॉम . टॅली ईआरपी-९, टॅली प्राइम, सिस्टम ऑडिटिंग, संगणकाचे ज्ञान असावे. शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
- लिपिक (Clerk) – उमेदवार पदवीधर असावा. अकौंटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक. मराठी/इंग्रजी भाषेत टायपिंगसह, शैक्षणिक क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
PDEA Pune Bharti 2024: अर्ज कसा करावा ?
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या(PDEA) वेबसाईटवर जाऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतो. त्याची लिंक सोबत दिली आहे.
http://recruitment.pdeapune.org/studentregistration
ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांच्या (हार्ड कॉपी) साक्षांकित झेरॉक्स प्रतींसह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या(PDEA) कार्यालयात जमा करायचा आहे. त्यासाठी पत्ता
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे
48/1 ए, एरंडवना, पौड रोड, पुणे-411038.
PDEA Pune Bharti 2024 : अर्ज शुल्क ?
उमेदवारांना अर्ज कार्यालयामध्ये जमा करताना रु.300/-प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल.
नोकरी संधी- भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअर्सची भरती, 55 जागांसाठी मागवले अर्ज
PDEA Pune Bharti 2024: अर्ज करण्याची शेवटची तारीख ?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2024 अशी आहे. अंतिम तारखेआधी अर्ज भरावा.
अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
भरती प्रकिया भरती प्रक्रियेची माहिती उमेदवारांना कळवण्यात यईल.