NTPC Baharti 2024 केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (NTPC) 223 पदांची भरती होत आहे. एनटीपीसीमध्ये (NTPC) असिस्टंट एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स पद भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
National Thermal Power Corporation recruitment 2024
NTPC Bharti 2024 पदाचे नाव:
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स) या पदाचा कालावधी 03 वर्षे आहे तो आणखी 02 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. NTPC च्या कोणत्याही स्टेशन /प्रकल्प /JVs /उपकंपन्यांवर पोस्टिंग असेल.
NTPC Bharti 2024 पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली असावी. त्याचप्रमाणे त्याला 100 मेगावॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या पॉवर प्लांटच्या ऑपरेशन / मेंटेनन्समध्ये किमान 01 वर्षाचा पात्रता अनुभव आवश्यक आहे. उमेदवार कमीत कमी 40 टक्के मार्कांनी पास झालेला असावा.
NTPC Bharti 2024 वयोमर्यादा:
कमाल वर्योमर्यादा 35 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांनी, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांनी, PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.
NTPC Bharti 2024 पद संख्या-
एकूण पदसंख्या 223 इतकी आहे. त्याची विभागणी खालील प्रमाणे आहे.
NTPC Bharti 2024 अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एनटीपीसीची वेबसाइट careers.ntpc.co.in वर लॉग इन करुन अर्ज करावा. सामान्य/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवाराने 300/- इतकी अर्ज फी असेल तर SC/ST/PwBD/XSM श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्याची गरज नाही.
NTPC Baharti 2024 निवड प्रक्रीया
निवड प्रक्रीयेसाठी व्यवस्थापन ऑनलाइन स्क्रीनिंग/शॉर्टलिस्टिंग/निवड चाचणी/मुलाखत यापैकी कोणताही पर्याय निवडू शकेल. त्याची माहिती उमेदवारांना दिली जाईल.
उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे. सामील होण्यापूर्वी, उमेदवारांना कोणत्याही NTPC रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तपशीलवार वैद्यकीय नियम careers.ntpc.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
NTPC Bharti 2024 वेतन-
निवड झालेल्या उमेदवारास रु. 55000/-.इतके वेतन अधिक भत्ते मिळतील. त्याचप्रमाणे कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.
NTPC Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटी तारीख 08 फेब्रुवारी 2024 ही आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याअगोदरच अर्ज करावा.
अधिक माहितीसीठी एनटीपीसीची वेबसाईटला भेट द्यावी.