पुण्यामधील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये ( Indian Institute of Information Technology, Pune (IIITP) प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची भरती होत आहे. प्राध्यापक पदाच्या 20 जागा तर शिक्षेकत्तर कर्मचारी पदाच्या 15 जागा भरल्या जाणार आहेत. त्याची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वात आधी IIITP या संस्थेविषयी..
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे (IIITP) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी सुरु केलेली माहिती तंत्रज्ञान संस्था आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला “महत्त्वाची राष्ट्रीय संस्था” म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये B.Tech आणि M.Tech अभ्यासक्रम चालवले जातात.
IIITP Bharti 2024 पद आणि पात्रता
सहाय्यक प्राध्यापक- कंप्युटर सायन्स एन्ड इंजिनिअरिंग
पद संख्या- 13 (ग्रेड I- 5 आणि ग्रेड II-8 )
ग्रेड I आणि ग्रेड II पदासाठी उमेदवाराची पी.एचडी आवश्यक आहे. तर ग्रेड पदासाठी संशोधन आणि शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक – इलेक्ट्रॉनिक एन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
पद संख्या- 6 (ग्रेड I- 3 आणि ग्रेड II-3 )
ग्रेड I आणि ग्रेड II पदासाठी उमेदवाराची पी.एचडी आवश्यक आहे. तर ग्रेड पदासाठी संशोधन आणि शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक – एप्लॉड मॅथेमॅटिक एन्ड डाटा सायन्स
पद संख्या- 2 (ग्रेड I- १ आणि ग्रेड II-१ )
ग्रेड I आणि ग्रेड II पदासाठी उमेदवाराची पी.एचडी आवश्यक आहे. तर ग्रेड पदासाठी संशोधन आणि शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे.
IIITP Bharti 2024 आता पाहूयात शिक्षेकेतर कर्मचारी, अधिकारी भरतीविषयी माहिती
सहायक निबंधक (Assistant Registrar) – पदव्युत्तर पदवी किमान ५५ % गुणांसह त्याच बरोबर 8 वर्षांचा अनुभव
कनिष्ठ अधीक्षक – पदवी 60 गुणांसह त्याबरोबर६ वर्षांच्या अनुभव
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) अधिक ३ वर्षांचा अनुभव
कनिष्ठ तंत्रज्ञ – डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर सायन्स एन्ड इंजिनिअरीग / माहिती तंत्रज्ञान किंवा ITI अधिक दोन वर्षांचा अनुभव
कनिष्ठ सहाय्यक (ग्रंथालय) – पदवी आणि लायब्ररी सायन्समध्ये पदविका किंवा 3 वर्षांची लायब्ररी सायन्स पदवी
IIITP Bharti 2024 वेतन
सहाय्यक प्राध्यापक – 7 व्या वेतन आय़ोगानुसार वेतन, वाहतूक भत्ता, महागाई भत्ता, HRA/निवास आणि NPS
सहायक निबंधक- ₹ 56100/- ते – ₹1,77,500/-
कनिष्ठ अधीक्षक – ₹35400/- ₹112400/-
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक- ₹35400/- ₹112400/-
कनिष्ठ तंत्रज्ञ – ₹21700/- ₹ 69100/-
कनिष्ठ सहाय्यक – ₹21700/- ₹ 69100/-
वरील सर्व पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि भत्ते मिळणार आहेत.
IIITP Bharti 2024 वयोमर्यादा-
उमेदवारांनी संबंधित पदाची वयोमर्यादा जाहिरातीमध्ये पाहावी. केंद्र सरकारच्या नियमांनुसार अनुसूचित जातींसाठी 5 वर्षे,
ओबीसीसाठी 3 वर्षे आणि पीडब्ल्यूडीसाठी 5 वर्षे वयाची सूट असेल.
IIITP Bharti 2024 निवडप्रक्रिया
सहाय्यक प्राध्यापक–
प्राप्त अर्जांची छाननी करुन फक्त शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांना बोलावले जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना UG विषयावरील डेमो क्लास घ्यावा लागेल त्यानंतर त्यांची वैयक्तिक मुलाखत होईल.
सहाय्यक निंबंधक- पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे असतील तर उर्वरित सर्व पदासाठी लेखी परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
IIITP Bharti 2024 अर्ज फी
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज फी
सहाय्यक निबंधक आणि उर्वरित पदांसाठी अर्ज फी
अर्ज फी भरण्यासाठी IIITP बॅक खात्याची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
IIITP Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18/03/2024 आहे.
IIITP Bharti 2024 2024 महत्वाच्या लिंक्स
प्राध्यापक भरती जाहिरात