इंजिनिअऱिंग आणि डिप्लोमा फ्रेशरसाठी महत्वाची माहिती. पुण्यातील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 50 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एप्रेंटीसपदाच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पाहूयात.
Ammunition Factory Bharti 2024 पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
ऍप्रेंटीस भऱतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या खालील प्रमाणे आहे. डिग्री उमेदवारांसाठी 25 तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 25 जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक पोस्टसाठी ग्रुप कोड देण्यात आलेला आहे. नियमानुसार आरक्षणाचे सर्व नियम या भरतीमध्ये लागू होणार आहेत.
Ammunition Factory Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी: मान्यताप्राप्त संस्थेची इंजीनियरिंगची पदवी आवश्यक् आहे
डिप्लोमा टेक्निशियन शिकाऊ उमेदवार: मान्यताप्रात्प संस्थेची इंजिनिअरिंग पदविका
उमेदवार पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर केवळ 3 वर्षांपर्यंत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराने आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार नियमानुसार अर्ज करण्यास अपात्र असतील.
ज्या उमेदवारांचा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची तारीख आणि प्रशिक्षण सुरू होण्याच्या तारखेमध्ये एक वर्षापेक्षा जास्त अंतर असल्यास उमदेवारांना गॅप सर्टिफिकेट द्यावे लागेल.
Ammunition Factory Bharti 2024 निवड प्रक्रिया:
ग्रॅज्युएशन / डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांवर आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://ddpdoo.gov.in/units/AFK या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
Ammunition Factory Bharti 2024 अर्ज कसा करावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत पोहोचला पाहिजे याची नोंद उमेदवारांना घ्यावी. अर्ज पाठवताना पाकिटावर ‘Application for the post of Graduate/Diploma Apprentice- Group code ‘ असे लिहावे. अर्ज पाठण्याचा पत्ता
‘द जनरल मॅनेजर, ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी, पुणे महाराष्ट्र पिन- 411003’
अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांनी https://forms.gle/zTCtyQdF3T1Bdj4W9 या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
सर्व उमेदवारांना नवीन NATS पोर्टल https://nats.education.gov.in वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
Ammunition Factory Bharti 2024 जनरल माहिती
निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. त्यासाठीची अधिक माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे ती इच्छुकांनी जरुर पाहावी.
उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना रोजगार देणे नियोक्त्याच्या वतीने बंधनकारक नाही. प्रशिक्षणादरम्यान निवासाची सोय केली जाणार नसल्याची नोदं इच्छुकांनी घ्यावी. दस्तऐवज पडताळणी, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीची तारीख https://ddpdoo.gov.in/units/AFK या वेबसाइटवर सूचित केली जाईल.
Ammunition Factory Bharti 2024 दरमहा स्टायपेंड
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ @ 9,000/- (INR नऊ हजार फक्त) p.m. एकत्रित
डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ उमेदवार @8,000/- (फक्त INR आठ हजार) p.m. एकत्रित
अर्ज करण्यासाठी खालील जाहिरात पाहावी. यामध्ये अर्जाचा नमुना देण्यात आला आहे.
https://ddpdoo.gov.in/documents/doc/3478bff516d900b68248ae1d8e38632b.pdf