पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईतील माझगाव शिपयार्डमध्ये नोकरी संधी उपलब्ध झालीय. त्याचबरोबर डिप्लोमा आणि इंजिनिअर्ससाठीही भरती होत आहे. अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदासाठी 200 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मिनी रत्न कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर लि.कडून अप्रेंटीस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 ही आहे.
Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) पदे आणि पदसंख्या
प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती होणार आहे. यामधील डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी 30, इंजिनिअर उमेदवारांसाठी 120 तर पदवीधरांसाठी 50 जागा आहेत. एकूण 200 पदांची भरती यावेळी होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवीधर असावा.
अन.क्र | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या | |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | डिप्लोमा अप्रेंटीस | ||
1 | सिव्हील इंजिनियरिंग | 10 | 05 |
2 | कंप्युटर इंजिनियरिंग | 05 | 05 |
3 | इलेक्ट्रिकल्स इंजिनियरिंग | 25 | 10 |
4 | इलेक्ट्रॉनिक एन्ड टेलिकम्युनिकेशन | 10 | 00 |
5 | मॅकेनिकल इंजिनिअरिंग | 60 | 10 |
6 | शिपबिल्डिंग टेक्नॉलॉजी एन्ड इंजिनिअरिंग | 10 | 00 |
7 | बी.कॉम, बीसीए, बीबीए, बीएसडब्ल्यू, इव्हेंट मॅनेजमेंट पदवी | 50 |
Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) वयोमर्यादा
एप्रेंटीस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 रोजी किमान 18 तर किमान 27 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांसाठी वयात ५ वर्षांनी सूट तर OBC-NCL उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची सुट देण्यात आली आहे.
Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment निवडप्रक्रिया
एमडीएल अप्रेंटिस पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे, उमेदवारांना एमडीएल येथे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवाराला त्याच्या विषयात मिळेलेल गुण आणि मुलाखत यांच्या आधारे निवड करण्यात येईल. उमेदवाराला मिळालेले गुण आणि मुलाखतीमध्ये मिळालेले गुणे यांचे वेटेज अनुक्रमे 80%आणि 20 % असे राहिल.
Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी माझगाव शिपयार्डची वेबसाईट www.mazagondock.in ला भेट द्यायची आहे यानंतर करिअर →ऑनलाइन रिक्रुटमेंट→ अप्रेंटिस या क्रमाने जाऊन नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी https://mazagondock.in/app/writereaddata/career/MDLATS-03-2023_Engg_graduate_Diploma_BOAT_Batch_2023_24_Rules_Regulations_21122023_21-12-2023164352.pdf या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी. महत्वाचे- अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
अर्जदारांनी NATS 2.0 वर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी सोबत दिलेल्या बेवसाईटला भेट द्या. https://nats.education.gov.in/ नोंदणी क्रमांक अर्ज करण्याच्या वेळी द्यावा लागेल.
Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू झालेली तारीख – 22 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2024
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. https://mazagondock.in/
या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx