एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मेगा भरती (AI AIRPORT SERVICES LIMITED Recruitment) होत आहे. यामध्ये तब्बल 828 जागांची भरती होणार आहे. १० वी पास ते एमबीए झालेल्या उमेदवारांना या नोकरीची आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एआय एअर सर्व्हिसेस लिमिटेडमधील भरतीसाठी उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीचे ठिकाण याविषयीची माहिती पाहूयात.
AI AIRPORT SERVICES LIMITED भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांसाठी महत्वाची भरतीसंबधीत माहिती. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये (AI AIRPORT SERVICES LIMITED) डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह , यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर/ज्युनियर ऑफिसर -कार्गो, सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह अशा वेगवेगळ्या १२ पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये एकूण 828 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
१. डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस : या पदासाठी उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याला १८ वर्षे अनुभव हवा किंवा उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/ MBA आणि १५ वर्षे अनुभव असावा. या पदासाठी ५५ वर्षे ही वयोमर्यादा आहे,
२. ड्यूटी मॅनेजर- रॅम्प : उमेदवार पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा तसेच त्याला १६ वर्षे अनुभव आवश्यक आहे या पदासाठी ५५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.
3. ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : उमेदवार मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग पदवीधारक असावा तसेच त्याच्याकडे LMV परवाना असावा. या पदासाठी वयोमर्यादा 28 आहे.
4. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह : उमेदवार मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा किंवा मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI तसेच NCVT असावा. त्याच्याकडे HVM परवाना असावा. उमेदवाराचे वय 28 पेक्षा जास्त नसावे.
5. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : उमेदवार १० वी पास असावा त्याचबरोबर त्याच्याकडे HVM परवाना असावा. या पदासाठी 28 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
6. ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर : उमेदवार पदवीधर असावा त्याचबरोबर त्याला या क्षेत्रातील १६ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी 55 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
7. ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर : उमेदवार पदवीधर असावा त्याच बरोबर त्याला १२ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी 50 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
8. ड्यूटी मॅनेजर – कार्गो : उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याला १६ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी 55 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
9. ड्यूटी ऑफिसर – कार्गो : उमेदवार पदवीधर असावा त्याला १२ वर्षे अनुभव असावा. या पदासाठी 50 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
10. ज्युनियर ऑफिसर – कार्गो : उमेदवार पदवीधर हवा त्याचबरोबर त्याला १२ वर्षांचा अनुभव असावा किंवा उमेदवार पदवीधर तसेच MBA आणि ६ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी 35 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
11. सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : यापदासाठी उमेदवार पदवीधर असावा त्याचबरोबर त्याला ५ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी 35 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
12. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर. या पदासाठी 28 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
अर्ज फी माहिती –
खुला प्रवर्गासाठी – ५०० रुपये तर मागासवर्गीय/ माझी सैनिक यांच्यासाठी कोणतीही फी नाही.
वयोमर्यादा-
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील भरतीसाठी पदानुसार वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात आली आहे. अधिक तपशीलासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन माहिती पाहा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
पदांची संख्या, वेतन माहिती
अनु. क्र | पदाचे नाव | पदांची संख्या | वेतन |
1 | डेप्युटी मॅनेजर रॅम्प/ मेंटेनेंस | 7 | 60,000/- |
2 | ड्यूटी मॅनेजर- रॅम्प | 28 | 45,000/- |
3 | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 24 | 28,200/- |
4 | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह | 138 | 25,980/- |
5 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 167 | 23,640/- |
6 | ड्यूटी मॅनेजर – पॅसेंजर | 19 | 45,000/- |
7 | ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर | 30 | 32,200/- |
8 | ड्यूटी मॅनेजर | 3 | 45,000/- |
9 | ड्यूटी ऑफिसर- कार्गो | 8 | 32,200/- |
10 | ज्युनियर ऑफिसर – कार्गो | 9 | 28,200/- |
11 | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | 178 | 26,980/- |
12 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 217 | 25,980/- |
इच्छुक उमेदवारांनी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत बेवसाईट https://www.aiasl.in/ भेट द्यावी आणि सविस्तर जाहिरात वाचावी
मुलाखतीचे ठिकाण, तारीख आणि निवड प्रक्रिया
मुलाखत दोन टप्प्यामध्ये होणार आहे, पद क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या पदांसाठी 18,19,20 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे ग्रुप डिस्कशन घेतले जाऊ शकते
पद क्रमांक 11 आणि 12 यांची मुलाखत 21, 22, 23 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये उमेदवारांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल. ही टेस्ट HMV ड्रायव्हिंग आणि ट्रेड नॉलेजवर आधारित असेल. ट्रेड टेस्ट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल.
मुलाखतीचे ठिकाण- GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – ४०००९९
उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर खालील लिंकवर जाऊन सविस्तर माहिती वाचावी,