महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामध्ये तब्बल 670 जागांची भरती होत आहे. Soil and Water Conservation Dept. Recruitment ‘जलसंधारण अधिकारी(स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत)’ संवर्गातील पदासाठी ही भरती होत आहे. छत्रपती संभाजीनगर आयुक्त,मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील ही सरळसेवा पद भरती होत आहे recruitment for civil engineers.
Soil and Water Conservation Dept. Recruitment पात्रता
जलसंधारण अधिकारी पदासाठी उमेदवार सिव्हील इंजिनीअरिंग पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा सिव्हील इंजिनीअरिंग पदवी(Degree in Civil Engineering) किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
या भरतीसाठी असलेल्या एकून जागांची प्रवर्गांनुसार खालील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे.
Soil and Water Conservation Dept. Recruitment वयोमर्यादा :
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी 2023 खुला प्रवर्गातील उमेदवाराचे वय 19 ते कमाल 40 वर्षे असावे तर मागासवर्गीय/ खेळाडू / अनाथ उमेदवारांसाठी हीच वयोमर्यादा 45 वर्ष पर्यंत आणि दिव्यांग – 47 वर्षेपर्यंत आहे.
Soil and Water Conservation Dept. Recruitment परीक्षा, निवडीची कार्यपद्धती :
या पदासाठी मराठी इंग्रजीमधून ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (objective multiple choice) स्वरुपात घेण्यात येईल. संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षेमध्ये (Computer Based Online Examination) नकारात्मक गुणपद्धती म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25 टक्के किंवा 1/4 गुण एकुण गुणांमधून कमी करण्यात येतील.
परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे असेल.
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त असेलेल्या उमेदवारांचा समावेश असेल. मौखिक परीक्षा interview घेतली जाणार नाही.
तात्पुरती निवड यादी व वेळापत्रक https:// swcd. maharashtra. gov. in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षायादी बेवसाईटव प्रसिद्ध होईल.
ऑनलाइन अर्ज कोठे करायचा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https:// swcd. maharashtra. gov. in या संकेतस्थळाला भेट द्यावी. परीक्षेचा अभ्यासक्रम विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध कऱण्यात येईल.
Soil and Water Conservation Dept. Recruitment परीक्षा शुल्क :
अमागास – रु. 1000/- तर मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस/ अनाथ/ दिव्यांग उमेदवारांसाठी– रु. 900/-. याशिवाय बँक चार्जेस आणि टॅक्स जादा भऱावा लागेल.
ऑनलाईन अर्ज आणि फी भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करताना अपलोड करावयाची विहीत प्रमाणपत्र/ कागदपत्रे यांची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Soil and Water Conservation Dept. Recruitment वेतन :-
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वेतन. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी – एस -15 : 41,800- 1,32,000 असे असेल.
महत्वाच्या लिंक्स आणि हेल्पलाईन नंबर-
हेल्पलाईन नंबर- 9513437783.
मृद व जलसंधारण विभाग वेबसाईट- https:// swcd. maharashtra. gov. in .
जाहिरात https://swcd.maharashtra.gov.in/user/pages/files/jalsandharan-padbharti-2023.pdf