NABARD recruitment 2024 : देशातल्या शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नाबार्डमध्ये (NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT) 31 तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नाबार्ड भरतीची माहिती सविस्तर पाहूयात.
NABARD recruitment 2024 : रिक्त पदांची माहिती
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – पद संख्या – 1
पात्रता- बी.ई. / B. Tech/ M.Sc./ M. Tech – संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा एमसीए
अनुभव-किमान 15 वर्षे
प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन – पद संख्या – 1
इंजिनिअरिंग, पदवी/पदव्युत्तर पदवी- संगणक विज्ञान / माहिती प्रणाली / व्यवस्थापन पदवी (कोडिंगच्या अनुभवासह, इ.)
अनुभव- किमान 07 वर्षे
लीड ऑडिटर – पद संख्या – २
कंप्युटर सायन्स/आयटी मध्ये बॅचलर/ पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech +8 वर्षांचा अनुभव
अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक – पद संख्या – 1
अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ वित्त/ व्यवसाय या विषयात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण/ /MBA/ PGDI किंवा CA/CS
वरिष्ठ विश्लेषक – सायबर सुरक्षा ऑपरेशन्स – पद संख्या – 1
कॉम्प्युटर सायन्स/आयटी/सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातील पदवीधर/पदव्युत्तर+ किमान अनुभव 10 वर्षे
जोखीम व्यवस्थापक – क्रेडिट जोखीम पद संख्या – 2
पदव्युत्तर पदवी- वित्त / वाणिज्य / अर्थशास्त्र / सांख्यिकी / अर्थमिती / गणित / गणितीय सांख्यिकी किंवा एमबीए / पीजीडीबीए / पीजीपीएम / पीजीडीएम किंवा सीए/आयसीडब्ल्यूए+ किमान अनुभव 5 वर्षे
रिस्क मॅनेजर – मार्केट रिस्क – पद संख्या – 2
पदव्युत्तर पदवी – वित्त / वाणिज्य / अर्थशास्त्र / सांख्यिकी / अर्थमिती / गणित / गणितीय सांख्यिकी किंवा एमबीए / पीजीडीबीए / पीजीपीएम / पीजीडीएम किंवा /CA/ ICWA.
रिस्क मॅनेजर – ऑपरेशनल रिस्क – पद संख्या – 2
पदव्युत्तर पदवी – वित्त / वाणिज्य / अर्थशास्त्र / सांख्यिकी / अर्थमिती / गणित / गणितीय सांख्यिकी किंवा एमबीए / पीजीडीबीए /
PGPM / PGDM किंवा /CA/ ICWA.+ 5 वर्षांचा अनुभव
रिस्क मॅनेजर – IS आणि सायबर सुरक्षा – पद संख्या – 1
पदवी- कंप्युटर सायन्स किंवा B.E./B. Tech किवा पदवी कंप्युटर सायन्स/आयटी + 5 वर्षांचा अनुभव
सायबर आणि नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ – पद संख्या – २
पदवी- कंप्युटर सायन्स किंवा B.E./B. Tech किवा पदवी कंप्युटर सायन्स/आयटी + 5 वर्षांचा अनुभव
डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम विशेषज्ञ – पद संख्या – 2
पदवी- कंप्युटर सायन्स किंवा B.E./B. Tech किवा पदवी कंप्युटर सायन्स/आयटी + 5 वर्षांचा अनुभव
IT पायाभूत सुविधा आणि बँकिंग विशेषज्ञ – पद संख्या – 2
पदवी- कंप्युटर सायन्स किंवा B.E./B. Tech किवा पदवी कंप्युटर सायन्स/आयटी + 5 वर्षांचा अनुभव
अर्थशास्त्रज्ञ – पद संख्या -2
MA/M.Sc- अर्थशास्त्र/ अप्लाईड इकॉनॉमिक्स/ फायनान्शियल इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स/ डेटा सायन्स/ फायनान्स
क्रेडिट अधिकारी – पद संख्या – १
पदवीधर (कोणत्याही विषयातील) आणि एमबीए (वित्त) / PGDBA/ PGDBM/ MMS (वित्त) / CA/ CFA/ ICWA
कायदेशीर अधिकारी – पद संख्या – 1
कायद्याची पदवी + 4-5 वर्षांचा अनुभव
ETL विकसक – पद संख्या – 1
B.E/B.Tech. /M.E/ M.Tech. in Computer Science /IT (Minimum 60% marks)
डेटा सल्लागार – पद संख्या – 2
B.E. / M.E. किंवा B.Tech/M.Tech in कंप्युटर सायन्स/ आय़टी/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग आणि AI
NABARD recruitment 2024 : वयोमर्यादा आणि अर्जाची प्रक्रिया
नाबार्डच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 25 ते 62 या दरम्यान असावे. प्रत्येक पदासाठी उमेदवाराचे शिक्षण आणि अनुभव यावर वयोमर्यादा ठरलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी. उमेदवारांनी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतर सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत.
NABARD recruitment 2024 :अर्ज फी आणि निवड प्रक्रिया
एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी [SC/ ST/ PWBD] उमेदवारांना 50/- रुपये तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 800/- रुपये असणार आहे.
उमेदवारांना निवड प्रक्रिया
पात्रता, अनुभवाच्या आधारावर उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
नाबार्ड भरती 2024 वेतन आणि कालावधी
नाबार्डच्या विविध पदांचे वेतन 1,25,000 ते 4,50,000 प्रतिमहिना असे आहे. या पदांची भरती सुरुवातीला 3 वर्षे कालावधीसाठी असेल, त्यामध्ये दोन वर्षाची वाढ होऊ शकते. तर काही पदाचा कालावधी 2 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवाराच्या कामाचे ठिकाण मुंबई हे असणार आहे.
NABARD recruitment 2024 महत्वाची तारीख आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.
नाबार्ड भरती 2024 महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट- https://www.nabard.org/