Mahavitaran Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये ‘विद्युत सहाय्यक’ पदांची भरती होणार आहे. सरळसेवा भरतीद्वारे 5347 जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची निवड पहिल्या तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि त्यानंतर ‘तंत्रज्ञ’ पदावर कायम नेमणूक होऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.
Mahavitaran Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर २९ डिसेंबर २०२३ रोजी ‘विद्युत सहाय्यक’ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा म्हणजेच बारावी (10+2) उत्तीर्ण असावा.
आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील(ITI) व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली NCVET यांनी वीजतंत्री / तारतंत्री ट्रेडसाठी दिलेले प्रमाणपत्र
किंवा
सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
किंवा
महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम (वीजतंत्री/तारतंत्री) प्रमाणपत्र.
Mahavitaran Recruitment 2024 वयोमर्यादा
: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय दिनांक 29/12/2023 रोजी किमान १८ वर्षे ते कमाल २७ वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. तर दिव्यांग उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
अर्ज कोठे करणार ?
ऑन लाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती पाहावी. फक्त ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जाणार आहेत.
Mahavitaran Recruitment 2024 ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप आणि निवडप्रक्रीया
ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीसाठी बोलावण्यात येईल. ऑनलाईन चाचणी ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची (objective type) असेल. यामध्ये तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान आणि सामान्य अभियोग्यता General Aptitude यावर विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.
परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजेच 120 मिनीटे असेल आणि 150 गुणांची ही परीक्षा असेल. परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा कऱण्यात येणार आहेत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी फेब्रुवारी ते मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. ऑन लाइन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येणार आहे.
ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल.
वेतन माहिती :
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात देण्यात येईल.
• प्रथम वर्ष : एकूण मानधन १५,००० रुपये
• द्वितीय वर्ष : एकूण मानधन १६,००० रुपये
• तृतीय वर्ष : एकूण मानधन १७,००० रुपये
तीन वर्ष पुर्ण केल्यावर उमेदवाराला तंत्रज्ञ पदाचे नियमित वेतन मिळेल.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज स्वीकृती करण्याची लिंक महावितरणच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. यासोबत ऑनलाइन अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या जाणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्यापही प्रसिद्ध करण्यात आली नाही. निवड प्रक्रियेसाठी ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च २०२४ पार पडेल.
अधिक माहितीसाठी आणि महत्त्वाच्या तारखांच्या महितीसाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला www.mahadiscom.in भेट देऊन वेळोवेळी Notification तपासणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या लिंक्स
-विद्यूत सहाय्यक पदाची जाहिरात पाहण्यासाठी लिंक-
-अर्ज करण्यासाठीची लिंक-
-आऱक्षण संबंधित माहितीसीठी महाराष्ट्र शासनाच्या https://gr.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी.