महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाकडून 255 (Mahaprisons Bharti 2024) जागांची भरती होत आहे. याची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या सरळ भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. कारागृह विभागाच्या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात.
Mahaprisons Bharti 2024 पद आणि पात्रता निकष
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,यांनी या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरातीमध्ये एकूण 25 वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे.
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या | पात्रता |
1) | लिपिक | 125 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
2) | वरिष्ठ लिपिक | 31 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा उत्तीर्ण |
3) | लघुलेखक निम्न श्रेणी | 4 | 10वी(SSC) किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण+ तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. + टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि |
4) | मिश्रक | 27 | 10वी/12वी उत्तीर्ण, B.Pharm/D.Pharm औषध व्यवसायीक म्हणून नोंदणी आवश्यक |
5) | शिक्षक | 12 | 10वी/12वी उत्तीर्ण, D.Ed, अनुभव असल्यास प्राधान्य |
6) | शिवणकाम निदेशक | 10 | 10वी(SSC) उत्तीर्ण , ITI ट्रेड -मास्टर टेलर तसेच 02 वर्षे अनुभव |
7) | सुतारकाम निदेशक | 10 | 10वी(SSC) उत्तीर्ण , ITI ट्रेड सुतारकाम तसेच 02 वर्षे अनुभव |
8) | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 8 | भौतिक आणि रसायनशास्त्र विषयासह 12वी(HSC) उत्तीर्ण तसेच 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक |
9) | बेकरी निदेशक | 4 | 10वी(SSC),ITI ट्रेड- बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप तसेच 02 वर्षे अनुभव आवश्यक |
10) | ताणाकार | 6 | 10वी(SSC), उत्तीर्ण ITI ट्रेड- (ताणाकार) तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
11) | विणकाम निदेशक | 2 | 10वी(SSC) उत्तीर्ण , ITI ट्रेड – विणकाम टेक्नोलॉजी तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
12) | चर्मकला निदेशक | 2 | 10वी(SSC) उत्तीर्ण , ITI ट्रेड-चर्मकला तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
13) | यंत्र निदेशक | 2 | 10वी(SSC) उत्तीर्ण ITI ट्रेड- मशीनिस्ट तसेच 0३ वर्षांचा अनुभव आवश्यक |
14) | निटिंग अँड विव्हिंग निदेशक | 1 | 10वी /12 वी उत्तीर्ण , ITI ट्रेड-विव्हिंग टेक्नोलॉजी तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
15) | करवत्या | 1 | 04 थी उत्तीर्ण तसेच सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव आवश्यक |
16) | लोहारकाम निदेशक | 1 | 10वी /12 वी उत्तीर्ण, ITI ट्रेड- शीट मेटल/ टिन स्मिथ तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
17) | कातारी | 1 | 10वी /12 वी उत्तीर्ण, ITI ट्रेड- कातारी (टर्नर) तसेच 0३ वर्षांचा अनुभव आवश्यक |
18) | गृह पर्यवेक्षक | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र |
19) | पंजा व गालीचा निदेशक | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण , ITI ट्रेड-विणकाम तसेच 02 वर्षांचा अनुभव आवश्यक |
20) | ब्रेललिपी निदेशक | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण आणि अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव आवश्यक |
21) | जोडारी | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण, ITI ट्रेड- फिटर तसेच 02 वर्षे अनुभव आवश्यक |
22) | प्रिप्रेटरी | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण, ITI ट्रेड (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) तसेच 02 वर्षांचा अनुभव |
23) | मिलिंग पर्यवेक्षक | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण त्याचबरोबरं वुलन टेक्निशियन हा ITI ट्रेड तसेच 02 वर्षांचा अनुभव |
24) | शारीरिक कवायत निदेशक | 1 | 10वी(SSC) उत्तीर्ण तसेच शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा पदवी प्रमाणपत्र |
25) | शारीरिक शिक्षक निदेशक | 1 | 10वी(SSC) शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा बीटी पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य |
Mahaprisons Bharti 2024 वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट तर एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची शिथिलता असणार आहे.
Mahaprisons Bharti 2024 परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: ₹1000/- तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹900/- परीक्षा फी आहे. माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.
Mahaprisons Bharti 2024 वेतनमान (Pay Scale) :
निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये इतके वेतन मिळू शकते.
Mahaprisons Bharti 2024 अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कारागृह विभागाच्या वेबसाईटवर भरायचा आहे. त्याची बेवसाईट https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html ही आहे. वेबसाईटला भेद दिल्यावर सर्वात आधी तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि अर्ज भरायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहावी. जाहिरातीमधील आवश्यक शैक्षणिक पात्रता व कागदपत्र यांची माहिती पाहावी. त्यांनतर अर्ज करायचा आहे. जाहिरात पाहण्यासाठीची लिंक सोबत दिली आहे. http://www.mahaprisons.gov.in/Uploads/pdf_GR/ae4343b4-32fd-468e-b7c3-5eb0120090a3Recruitment.pdf
Mahaprisons Bharti 2024 परीक्षेचे स्वरुप
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अंकगणित यावर आधारित असेल. लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी 200 गुणांसाठी 100 प्रश्न तर उर्वरित पदांसाठी 120 गुणांसाठी 60 प्रश्न असतील.
लघुलेखक निम्न श्रेणी आणि तांत्रिक संवर्गातील पद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व पदांकरिता 80 गुणांची व्यवसायिक चाचणी होईल.
परीक्षेचा दिनांक आणि कालावधी अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. मात्र तो लवकरच http://www.mahaprisons.gov.in येथे अपडेट केला जाईल. तसेच उमेदवारांना कळवण्यात येईल.
Mahaprisons Bharti 2024 नोकरी ठिकाण:
निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक संपूर्ण महाराष्ट्र होऊ शकते.
महत्वाच्या लिंक्स
कारागृह विभागाची वेबसाईट- http://www.mahaprisons.gov.in
जाहिरातीसाठी लिंक- http://www.mahaprisons.gov.in/Uploads/pdf_GR/ae4343b4-32fd-468e-b7c3-5eb0120090a3Recruitment.pdf
अर्ज करण्यासाठी लिंक- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html