Indian Coast Guard Bharti 2024 : भारताच्या विस्तूत समुद्रकिना-यांची सुरक्षा करणा-या भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती होत आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये Indian Coast Guard ‘नाविक’ पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या भरतीची विस्तृत माहिती पाहूयात.
Indian Coast Guard Bharti 2024 पदाचे नाव आणि पात्रता
नाविक ( जनरल ड्युटी)- शैक्षणिक पात्रता- उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा त्याने 12वीमध्ये गणित आणि फिजिक्स विषय असेन अनिवार्य आहे.
Indian Coast Guard Bharti 2024 रिक्त पदे आणि अर्ज प्रक्रिया :
भारतीय तटरक्षक दलाच्या अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी) च्या २६० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कोस्ट गार्डच्या सहा झोनसाठी ही भरती होत आहे. प्रत्येक झोनसाठी आरक्षणाच्या नियमानुसार जागा उपलब्ध आहेत. इच्खुक उमेदवार भरतीची जाहिरात या लिंकवर पाहू शकतात.
Indian Coast Guard Bharti 2024 वयोमर्यादा :
नाविक पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय १८ते २२ वर्षे यादरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म ०१ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑगस्ट २००६ (दोन्ही समावेशी) दरम्यान झालेला असावा. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 शिथिल करण्यात आली आहे.
Indian Coast Guard Bharti 2024 निवडप्रक्रिया-
उमेदवाराच्या निवडप्रक्रियेचे चार टप्पे आहेत. भरती होण्यासाठी उमेदवाराला प्रत्येक टप्प्यामधून उमेदवाराला पार करावा लागेल
टप्पा- I- -संगणक आधारित परीक्षा
टप्पा-II.
-मूल्यांकन चाचणी.
-शारीरिक तंदुरुस्ती चाचणी.
-दस्तऐवज पडताळणी
-भरती वैद्यकीय परीक्षा.
टप्पा – III.
-दस्तऐवज पडताळणी
-INS चिल्का येथे नावनोंदणीपूर्व वैद्यकीय
टप्पा- IV– -बोर्ड/विद्यापीठ/राज्य यांच्यामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी
Indian Coast Guard Bharti 2024 वेतन-
नाविक (सामान्य कर्तव्य) पदासाठी मूळ वेतन रु. 21700/- (पे स्तर-3) असेल. त्याचबरोबर उमेदवाराला महागाई भत्ता आणि प्रचलित नियमांनुसार कर्तव्याच्या स्वरूपावर/ पोस्टिंगच्या जागेवर आधारित इतर भत्ते मिळतील
Indian Coast Guard Bharti 2024 परीक्षा फी
कोस्ट गार्ड भरतीचे परीक्षा शुल्क 300/- (रुपये तीनशे फक्त) इतके आहे. परीक्षा फी ऑनलाइन भरायची आहे. SC/ST उमेदवारांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
महत्वाची तारीख आणि लिंक्स
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
इंडियन कोस्ट गार्डचे अधिकृत संकेतस्थळ : https://joinindiancoastguard.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा