CRPF recruitment 2024
CRPF recruitment 2024 केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CENTRAL RESERVE POLICE FORCE) कॉन्स्टेबल पदाची भरती होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलामधील(CRPF)ही भरती खेळाडूंसाठी होत आहे. कॉन्स्टेबल पदावर भरती झालेल्या उमेदवारांना भारतात किंवा परदेशातही पोस्ट केले जाऊ शकते. या भरतीसंबंधित सर्व माहिती सविस्तर पाहूयात.
कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कॉन्स्टेबल पदाच्या 169 जागा या भरल्या जाणार आहेत.
CRPF recruitment 2024 पात्रता
कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कमीत कमी 10 वी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावा. उमेदवाराने पैकी कोणत्याही एका क्रीडाप्रकारामध्ये राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. या स्पर्धांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त असाव्यात किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे आयोजित केलेल्या असाव्यात.
किंवा
उमेदवाराने राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये त्याच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले असावे
किंवा
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFD) द्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
CRPF recruitment 2024 वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 28 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 05 वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे शिथिल करण्यात आली आहे.
CRPF recruitment 2024 कोणत्या क्रीडा प्रकाराचा समावेश
अ.क्र | क्रीडा प्रकार | पद संख्या | अ.क्र | क्रीडा प्रकार | पद संख्या | अ.क्र | क्रीडा प्रकार | पद संख्या |
1) | जिम्नॅस्टिक | 6 | 10) | तायक्वांदो- | 5 | 19) | कराटे- | 6 |
2) | ज्युडो | 6 | 11) | वॉटर स्पोर्ट्स कयाक- | 4 | 20) | योग – | 5 |
3) | वुशू- | 9 | 12) | डोंगी – | 4 | 21) | अश्वारूढ | 10 |
4) | शूटिंग- | 9 | 13) | रोइंग- | 2 | 22) | नौकाविहार | 10 |
5) | बॉक्सिंग – | 5 | 14) | शरीर सौष्ठव- | 2 | 23) | आईस हॉकी | 8 |
6) | ऍथलेटिक्स- | 22 | 15) | वेटलिफ्टिंग- | 7 | 24) | आईस स्केटिंग | 8 |
7) | धनुर्विद्या- | 6 | 16) | पोहणे- | 14 | 25) | आइस स्कीइंग | 4 |
8) | कुस्ती फ्री स्टाइल- | 10 | 17) | डायव्हिंग – | ||||
9) | ग्रीको रोमन- | 1 | 18) | ट्रायथलॉन- |
CRPF recruitment 2024 निवडप्रक्रीया
ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज केला आहे. उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे कागदपत्र तपासणी होईल. त्यानंतर शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय चाचणी या प्रक्रिया पार कराव्या लागतील.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेल्या पदक/सहभागी प्रमाणपत्रांचा आधार उमेदवारांना गुण दिले जातील. पदके/सहभागी प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी काढली जाईल. त्यानंतर होणा-या PST मध्ये पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर वैद्यकीय परीक्षेसाठी Detailed Medical Examination(DME) निवडले जाईल.
CRPF recruitment 2024 वेतन
कॉन्स्टेबल/जनरल स्तर-३ साठी निवड झालेल्या उमेदवारांना सातवा वेतन आयोगानुसार रुपये 21,700 -69,100 इतके असेल.
CRPF recruitment 2024 अर्ज करण्याची प्रकिया आणि शुल्क
इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CENTRAL RESERVE POLICE FORCE)च्या अधिकृत वेबसाईट https://rect.crpf.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/02/2024 आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रु. 100/- फी भरावी लागेल. महिला आणि SC/ST उमेदवारांना कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात- https://rect.crpf.gov.in/Upload/Recruitment/09012024-626.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- https://rect.crpf.gov.in/