BEL recruitment for Engineers 2024 संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BEL) इंजीनियरसाठी भरती होत आहे. ट्रेनी इंजीनियर-I आणि प्रोजेक्ट इंजीनियर-I या दोन पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट एड एनोव्हेशन सेंटर (PDIC) आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoE), बेंगळुरूसाठी जागा भरल्या जाणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पाहूयात.
BEL recruitment for Engineers 2024 पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineers- I:): उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/संगणक विज्ञान विषयामध्ये 55% आणि त्याहून अधिक गुणांसह B.E./ B. Tech/ B.Sc Engineering degree उत्तीर्ण असावा. General/ OBC/ EWS उमेदवारांना 55% किंवा त्याहून अधिक तर SC/ ST/ PwBD उमेदवार उत्तीर्ण असावेत. त्याचप्रमाणे उमेदवाराला 06 महिन्यांचा कामाचा अनुभव असावा.
प्रकल्प अभियंता – I (Project Engineers – I)- उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान विषयामध्ये 55% आणि त्याहून अधिक गुणांसह B.E./ B. Tech/ B.Sc Engineering degree उत्तीर्ण असावा. General/ OBC/ EWS उमेदवारांना 55% किंवा त्याहून अधिक तर SC/ ST/ PwBD उमेदवार उत्तीर्ण असावेत. उमेदवाराला कामाचा 02 वर्षे अनुभव असावा.
इंजिनिअरिंगचे विषय खालील प्रमाणे असावेत.
BEL recruitment for Engineers 2024
ट्रेनी इंजिनिअर-I पदासाठी उमेदवाराचे वय 28 पेक्षा जास्त नसावे तर प्रोजक्ट इंजिनिअर-I पदासाठी उमेदवाराचे वय 32 पेक्षा जास्त नसावे. OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे तर SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा 05 वर्षे शिथिल राहिल.
BEL recruitment for Engineers 2024 निवड प्रक्रिया-
प्रात्र उमेदवारांची 85 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यामधील गुणांच्या आधारे उमेदवार मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना बोलावले जाईल. लेखी चाचणी/मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी, BEL वेबसाइटवर पोस्ट केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत बेंगलुरुमध्ये होईल.
BEL recruitment for Engineers 2024 अर्ज फी:
प्रशिक्षणार्थी अभियंता-1 : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी रु. 150/- अधिक 18% GST.
प्रकल्प अभियंता-1 : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना रु. 400/- अधिक 18% GST.
SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही अर्ज फी नाही. अर्ज फी भरण्याच्या सुचना बेवसाईटवर दिलेल्या आहेत.
अर्ज फी भऱण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=14842
BEL recruitment for Engineers 2024 अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या फॉरमॅटमध्ये अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज पोस्टद्वारे A-4 साईजच्या लिफाफ्यामध्ये पाठवायचा आहे. लिफाफ्यावर पोस्टचे नाव ठळक अक्षरात लिहायचे आहे. अर्जासोबत पाठवायची कागदपत्रांची यादी जाहिरातीसोबत दिली आहे, त्याची लिंक सोबत दिली आहे.
अर्ज पाठण्याचा पत्ता
Manager (HR),
Product Development & Innovation Centre (PDIC),
Bharat Electronics Limited,
Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle,
Jalahalli Post, Bengaluru – 560 013, India.
BEL recruitment for Engineers 2024 वेतन आणि कालावधी
Trainee Engineer-I या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 30.000 दुस-या वर्षी 35000 तर तिस-या वर्षी 40000 इतके वेतन मिळेल
तर Project Engineer-I या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 40000 दुस-या वर्षी 45000 तर तिस-या वर्षी 40000 आणि शेवटच्या वर्षी 55000 इतके वेतन मिळेल
BEL recruitment for Engineers 2024 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख
उमेदवारांनी अर्ज 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोस्टाने पोहोचेल याची खबरदारी घ्यावी.