रेल्वे परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांची भरती होत आहे. टेक्निशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी ही भरती होत आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवरून भरतीची रुपरेषा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे..चला तर याची सविस्तर माहिती घेऊयात.
देशातील तरुणांना रोजगाराची संधी देणारी संस्था म्हणजे भारतीय रेल्वे…याच रेल्वेमध्ये 9000 जागांची भरती होत आहे. टेक्निशियन पदासाठी ही भरती होत आहे. भरतीची ऑनलाईन प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरु होत आहे.
Railway Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड 1 व ग्रेड 2 पदांसाठी ही भरती राबविण्यात येत आहे.
‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ सिग्नलसाठी – 1,100 जागा.
‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड २ साठी – 7,900 जागा.
Railway Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
रेल्वेने या भरतीसंबंधीत नोटीफिकेशन प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक पात्रतचे तपशील लवकरच अपडेट करण्यात येतील.
Railway Recruitment 2024 : परीक्षा फी
टेक्निशियन पदासाठी होणा-या परीक्षेसाठी सामान्य वर्गातील (जरनल कॅटेगरी) उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. तर, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे. जे जनरल कॅटेगरीमधील उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित राहतील त्यांना परीक्षा फी मधील 400 रुपये तर राखीव कॅटेगरीमधील उमेदवारांना 250 रुपये रेल्वेकडून माघारी करण्यात येणार आहेत.
Railway Recruitment 2024 : वेतन
नोटीफिकेशन नुसार ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड 1 पदासाठी 29,200/- रुपये इतके वेतन तर ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड 2– 19,900/- रुपये वेतन आहे.
Railway Recruitment 2024 : वयोमर्यादा
टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी किमान वयोमर्यादा 18 तर कमाल 36 वर्षे आहे. टेक्निशियन ग्रेड 2 पदासाठी वयोमर्यादा किमान 18 तर कमाल 33 वर्षे आहे.
नोकरी संधी- भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 जागांची भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.
रेल्वे भरती – परीक्षा पद्धती
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची संगणकावर आधारित चाचणी (CBT) परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहेत.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या कोणत्याही एका RRBवरून अर्ज करायचा आहे. उमेदवार कोणत्याही एका RRBवरून अर्ज करू शकतो. एकाच अर्जामध्ये विविध पदांसाठी प्राध्यान्यक्रम त्याला द्यावा लागेल.
रेल्वे भरती- महत्वाच्या तारखा:
रेल्वेकडून लवकरच सविस्तर जाहिरात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या बेवसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. उच्छुक उमेदवारांनी https://rrbmumbai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात 09.03.2024 रोजी होईल
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08.04.2024 आहे.