अंगावर पोलीस वर्दी घालावी अशी इच्छा बाळगून भरतीची Police Bharti 2024 तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर… राज्य सरकारकडून लवकरच 17,000 हून अधिक पदांची भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. याच भरतीची अधिक माहिती सविस्तर पाहूयात.
Police Bharti 2024 माहिती
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई, पोलिस वाहन चालक, बॅन्डसमन, सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई या पदांची भरती होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यास 5 मार्च पासून सुरुवात झाली आहे. तर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.
Police Bharti 2024 पदनिहाय जागा
पोलीस शिपाई : 9595 जागा,
पोलीस शिपाई चालक : 1686 जागा,
कारागृह शिपाई: 1800 जागा,
सशस्त्र पोलीस शिपाई : 4349 जागा,
बँड्समन : 41 जागा भरल्या जाणार आहेत.
Police Bharti 2024 अर्ज कसा करायचा ?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळाला भेट घ्यायची आहे. या संकेतस्थळावर भरतीसंबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तसेच याच वेबसाइटवर ऑनलाइन अर्जही सादर करता येणार आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Police Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. तर ड्राइवर आणि ब्रान्द्स मेन पदासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावा.
त्याचबरोबर ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराकडे वाहन चालक परवाना पाहिजे. तर बॅण्डसमन पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराकडे वाद्य प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पोलीस भरती 2024 : परीक्षा परीक्षा शुल्क
या पोलीस भरतीसाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी ₹450 तर मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹350 इतके परीक्षा शुल्क असेल.
Police Bharti 2024 वयोमर्यादा
पोलीस भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांतील उमेदवारांच्या वयामध्ये सुट देण्यात आली आहे.
Police Bharti 2024 शाररिक क्षमता
उंची- मुलांची उंची 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर सशस्त्र पोलीस दलासाठी मुलांची उंची 167 सेंटीमीटर असावी. तर मुलींची उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक.
वजन– मुलांचे वजन कमीतकमी 50 किलो असावे. तर मुलींचे वजन कमीतकमी 45 किलो असावे.
पोलीस भरती 2024 निवड प्रक्रीया
शारीरिक चाचणी – शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आण गोळाफेक यांचा समावेश आहे. शारीरिक चाचणीसाठी 50 गुण असतील. पदानुसार हे गुण बदलतील.
लेखी चाचणी– लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेसाठी 100 गुणांची चाचणी घेतली जाईल त्याला 90 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला असेल.
उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
नोकरी संधी -रेल्वेमध्ये लवकरच 9000 जागांची भरती, टेक्निशियन पदाच्या भरतीची आत्तापासूनच करा तयारी…
पोलीस भरती 2024 आवश्यक कागदपत्र
- SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
- जन्म दाखला,
- रहिवाशी प्रमाणपत्र,
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र,
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
- खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती
- नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्रः
- माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
- गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र