गोवा शिपयार्ड लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न कंपनी आहे. Goa Shipyard Recruitment 2024 गोवा शिपयार्डमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदांसाठी भरती सुरू आहे. BE. B.tch. MBA, CA उमेदवारांसाठीच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्यासाठी जहाज निर्मिती करते. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात.
गोवा शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या नियमित पदासाठी थेट भरती होत आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
Goa Shipyard Recruitment 2024 पदांची माहिती
मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल)- या पदासाठी उमेदवार मॅकेनिकल इंजिनिअरींग किंवा बीटेक कमीत कमी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा.
मॅनेजमेंट ट्रेनिंग (इलेक्ट्रिकल)- उमेदवार इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग किंवा बी.टेक केलेले असावे. त्याला कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक आहेत
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स)- उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा बी. टेक इलेक्ट्रॉनिक्स असावा. तउमेदवाराला कमीत कमी 60 टक्के गुण हवेत.
मॅनेजमेंट ट्रेनी (नेव्हल आर्किटेक्चर)- उमेदवार नेव्हल आर्किटेक्चर विषयामध्ये इंजिनीअरिंग किंवा बी.टेक फस्टक्लासमध्ये उत्तीर्ण केलेले असावे.
मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्सेस) – उमेदवार कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असावा. त्याचबरोबर त्याने दोन वर्षांचा रेग्युलर एमबीए/ एमएसडब्ल्यु/ पीजी डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. त्यामध्ये त्याने ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट/ पर्सनल मॅनेजमेंट/ लेबर अँड सोशल वेलफेअर/ लेबर स्टडीज/ सोशल वर्क या विषयांमध्ये स्पेशलायझेशन केलेले असावे.
मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स)- उम्मीदवार हा पदवीधर असावा आणि त्यानी तो चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कॉस्ट अकाऊंटंट असावा.
मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या एकूण जागा आणि त्यासाठी असलेले रिझर्वेशन खालील प्रमाणे आहेत.
Goa Shipyard Recruitment 2024 वयोमर्यादा –
मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे जास्तीत जास्त वय 28 वर्ष असावे. इतर मागासवर्गीय उमेदवाराचे कमाल वय 31 तर एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची वय 33 वर्षे असावे.
Goa Shipyard Recruitment 2024 निवडीचे निकष –
अर्ज केले पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. ही परीक्षा कम्प्युटर बेस टेस्ट(CBT) किंवा पेन पेपर बेस्ड् टेस्ट (PBT) होईल. एकूण 85 गुणांची मल्टीपल चॉईसेस क्वेशन परीक्षा दोन भागांमध्ये विभागली जाणार आहे. पहिल्या भागामध्ये उमेदवाराच्या विषया संदर्भात तर दुसऱ्या भागामध्ये जनरल मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट असेल.
परीक्षेमध्ये ५० टक्केच्या वर गुण असलेले उमेदवार इंटरव्ह्यूवसाठी पात्र ठरतील. इंटरव्ह्युव 15 गुणांचा असेल.
हे ही वाचा- केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये खेळाडूंना नोकरीची सुवर्णसंधी…आजच अर्ज करा.
Goa Shipyard Recruitment 2024 मानधन-
निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 बेसिक वेनत मिळेत. त्याचबरोबर त्याला नियमानुसार सर्व भत्ते मिळती. एक वर्षाचे ट्रेनिंग पुर्ण केल्यावर उमेदवाराला असिस्टंट मॅनेजर पदावर नियमित केले जाईल. हा पगार तुम्ही एकदा पाहाच.
Goa Shipyard Recruitment 2024 अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी गोवा शिपयार्डच्या www.goashipyard.in वेबसाइटला भेट द्यावी. नोटीसबोर्ड- करियर या टॅबवर जाऊन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ₹500 इतकी अर्ज फी भरावे लागेल. एससी/एसटी/ पीडब्ल्यूबीडी/ इक्स सर्विसमॅन उमेदवारांना कोणतीही ॲप्लिकेशन फी नाही.
Goa Shipyard Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची मुदत-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 02.02.2024 तारीख आहे.
महत्वाच्या लिंक्स-
जाहिरात- https://goashipyard.in/file/2023/12/Advt.-No.-07-2023.pdf
गोवा शिपयार्ड बेवसाईट- https://goashipyard.in/