CGCAT Bharti 2024 भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट (गट “अ” राजपत्रित अधिकारी) पदाची भरती होत आहे. असिस्टंट कमांडंट पदाच्या एकूण 70 जागा भरल्या जाणार आहेत. या भऱतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार 19 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरू शकतात. असिस्टट कमांडंट पदासाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, निवडप्रकिया, वेतन आणि ऑनलाईन अर्जासंबंधित सविस्तर माहिती पाहूयात.
CGCAT Bharti 2024 शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) – 50 पदे
पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 % गुणांसह पदवी
12वी (गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह )किमान 55 % गुण
असिस्टंट कमांडंट (टेक्निकल-मॅकेनिकल)
पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा मरीन किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन किंवा मेटलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस) 60 % गुणांसह उत्तीर्ण
12वी (गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह) किमान 55 % गुण.
असिस्टंट कमांडंट (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)
पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग पदवी (इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 60 % गुणांसह उत्तीर्ण
12वी (गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह) किमान 55 % गुण.
कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट भरती – वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान २१ ते कमाल २५ वर्षे असावे [SC/ST – 05 वर्षे तर OBC- 03 वर्षे सूट]. उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 प्रमाणे मोजण्यात येईल. उमेदवार 01 जुलै 1999 आणि 30 जून 2003 दरम्यान जन्मलेला असावा.
CGCAT Bharti 2024 अर्ज फी –
कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट भरतीचे अर्ज शुल्क 300/- आहे. तर SC/ST उमेदवारांना अर्ज फी नाही.
कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट भरती– अर्ज कसा करावा.
उमेदवारांनी अर्ज ‘ऑनलाइन’ पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी https://joinindiancoastguard.cdac.in या वेबसाईटला भेट द्यावी. अर्जाची लिंक 19 फेब्रुवारीला सुरु होईल.
नोकरी संधी- भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 जागांची भरती, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.
CGCAT Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहिरातीमध्ये ती जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
CGCAT Bharti 2024 निवड प्रक्रिया
निवडप्रक्रियेचे पाच टप्पे आहेत.
टप्पा -1 CGCAT उमेदवारांना ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा CGCAT द्यावी लागेल. यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक नकारात्मक गुण असेल. या परीक्षेमध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतात
टप्पा- II उमेदवारांना CGCAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची कंप्युटर कॉग्निटीव्ह बॅटरी टेस्ट आणि पिक्चर पर्सेप्शन आणि डिस्कशन टेस्ट (PP&DT) होईल.
टप्पा III– या टप्प्यामध्ये उमेदवारांची उमेदवारांना मानसशास्त्रीय चाचणी, गट कार्य आणि मुलाखत (व्यक्तिमत्व चाचणी) दिली जाते.
टप्पा IV– वैद्यकीय परीक्षा
टप्पा -V उमेदवार स्टेज – V पूर्ण केलेल्या उमेदवारांची नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (NOC) निवड होते. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर 2024मध्ये पुर्ण होणे अपेक्षित आहे.
CGCAT Bharti 2024 वेतन
इंडियन कोस्ट गार्डमधील असिस्टंट कमांडंट पदासाठी 56,100/- अधिक नियमानुसार लागू असलेले भत्ते मिळतात.
CGCAT Bharti 2024 महत्वाची तारीख
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मार्च 2024
Indian Coast Guard Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
इंडियन कोस्ट गार्डचे अधिकृत संकेतस्थळ : https://joinindiancoastguard.cdac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा(19 फेब्रवारीपासून सुरु)