Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’Specialist Security Officer पदाची भरती होत आहे. यामध्ये माजी सैनिकांसाठी मोठी संधी आहे. बँकेच् अधिकृत वेबसाईटवर याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Bank of India Bharti 2024 पदाची माहिती
देशभर बँकींगचे जाळे असलेल्या बँक ऑफ इंडिया, मुंबईमधील मुख्य कार्यालयामध्ये मिडल मॅनेजमेंटमध्ये सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवार bankofindia.co.in वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटती तारीख 3 एप्रिल2024 आहे.
वेतन
Middle Management Grade Scale–II नुसार 48170 – 1740(1) – 49910 – 1990(10) – 69810 इतके वेतन असेल.
Bank of India Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता, अनुभव
‘स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर’ Specialist Security Officer या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे २५ ते ३५ वर्षांदरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असावा तसेच तीन महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
अनुभव :इच्छुक उमेदवाराकडे खालील पैकी एका क्षेत्रातील अनुभव असावा
लष्कर, नौदल किंवा हवाई दलामध्ये अधिकारी पदाचा पाच वर्षांपेक्षा अनुभव
किंवा
पोलिस उपअधीक्षक किंवा उच्च पदावर किमान पाच वर्षांचा अनुभव
किंवा
निमलष्करी दलात सहायक कमांडन्टच्या पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव
Bank of India Bharti 2024 निवड प्रक्रिया
निवड पक्रियामध्ये फक्त वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. वैयक्तिक मुलाखतीसाठी 100 गुण असतील.
तर
वैयक्तिक मुलाखत(70 गुण) आणि गट चर्चेच्या(30 गुण) आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज शुल्क –
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175/- रुपये.
उर्वरित सर्व श्रेणींसाठी- 850/- रुपये
Bank of India Bharti 2024 अर्ज कसा कराल?
बँकेच्या अधिकृत bankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या. किंवा https://ibpsonline.ibps.in/boissofeb24/ या वेबसाईटवरून अर्ज भरा.