SBI Apprentice Recruitment 2026स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत देशभरात अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर तरुणांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेत काम करण्याचा आणि प्रशिक्षण घेण्याचा अनुभव मिळवण्याची ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे.
भरतीचा संक्षिप्त तपशील (Job Overview)
| तपशील | माहिती |
| संस्था | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
| पदाचे नाव | अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) |
| एकूण जागा | 7150 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (महाराष्ट्रासह) |
| वेबसाईट | jwww.sbi.co.in/careers |
प्रवर्गनिहाय जागांचा तपशील (Vacancy Details)
| प्रवर्ग (Category) | एकूण जागा PDF |
| SC | 1107 |
| ST | 586 |
| OBC | 1672 |
| EWS | 699 |
| UR (खुला) | 3086 |
| एकूण | 7150 पदे |
(टीप: महाराष्ट्रासाठी एकूण 504 जागा उपलब्ध आहेत.)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility)
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी (01 एप्रिल 2026 रोजी).
- वयोमर्यादा: 01 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. (उमेदवाराचा जन्म 02.04. 1998 ते 01.04.2006 दरम्यान झालेला असावा ).
- सवलत: SC/ST/OBC/PwBD प्रवर्गातील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
वेतन (Salary) आणि अर्ज फी (Application Fee)
- वेतन (Stipend): निवड झालेल्या उमेदवारांना १ वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दरमहा ₹१५,०००/- स्टायपेंड दिला जाईल.
- अर्ज फी: * General / OBC / EWS प्रवर्ग: ₹३००/-
- SC / ST / PwBD प्रवर्ग: कोणतीही फी नाही (NIL)
SBI Recruitment 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 19 मे 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 जून 2026
- ऑनलाईन परीक्षा (संभाव्य): जुलै 2026
अर्ज कसा करावा? (How to Apply)
1. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NAPS पोर्टलवर (https://apprenticeshipindia.gov.in) नोंदणी करणे अनिवार्य आहे.
2. त्यानंतर SBI च्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.sbi.co.in/careers) जाऊन ‘Current Openings’ मध्ये जा आणि ऑनलाईन अर्ज करा.
3. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा.
4. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी, फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या आकारात अपलोड करा.
5. आपल्या प्रवर्गानुसार ऑनलाईन फी भरा आणि अर्ज यशस्वीरीत्या सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
SBI Recruitment 2026 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| आवश्यक दुवे | लिंक्स |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | www.sbi.co.in/careers |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
रोजच्या नवीन नोकरी अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा!






