ISRO recruitment 2026 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ‘द्रव नोदन प्रणाली केंद्रात’ (LIQUID PROPULSION SYSTEMS CENTRE- LPSC) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वलियमला (तिरुवनंतपुरम) येथील युनिटसाठी वैज्ञानिक आणि अभियंता (Scientist/Engineer ‘SC’) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 एप्रिल 2026 (दुपारी 2:00 वाजेपासून).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2026 (दुपारी 2:00 वाजेपर्यंत).
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 13 मे 2026 (दुपारी 2:00 वाजेपर्यंत).
पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Post Details & Eligibility):
इसरोमध्ये ‘वैज्ञानिक/अभियंता SC’ (स्त्रर 10: ₹56,100 – 1,77,500) या पदासाठी खालील विद्याशाखांमध्ये भरती होत आहे:
- पद क्र. 803: मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनीअरिंगमध्ये B.E/B.Tech आणि वेल्डिंग टेक्नॉलॉजीमध्ये M.E/M.Tech.
- पद क्र. 804: मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये B.E/B.Tech आणि टर्बो मशिनरी/IC इंजिनमध्ये M.E/M.Tech.
- पद क्र. 805: इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E/B.Tech आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/कंट्रोलमध्ये M.E/M.Tech.
- पद क्र. 806: इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E/B.Tech आणि RF/मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगमध्ये M.E/M.Tech.
- पद क्र. 807: धातुकर्म (Metallurgy)/मटेरियल सायन्स इंजिनीअरिंगमध्ये B.E/B.Tech.
(टीप: B.E/B.Tech मध्ये किमान 65% गुण किंवा 6.84 CGPA असणे अनिवार्य आहे.)
ISRO recruitment 2026 वयोमर्यादा (Age Limit):
- पद क्र. 803 ते 806 साठी कमाल वय 30 वर्षे आहे.
- पद क्र. 807 साठी कमाल वय 28 वर्षे आहे.
- सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्षे असावे. (सरकारी नियमांनुसार सवलत लागू) .
ISRO recruitment 2026 निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत या आधारावर केली जाईल. अंतिम निवड यादीमध्ये लेखी परीक्षेला 50% आणि मुलाखतीला 50% वेटेज दिले जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee):
- सर्व उमेदवारांना सुरुवातीला ₹750 शुल्क भरावे लागेल.
- महिला, SC/ST, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना लेखी परीक्षेत उपस्थित राहिल्यास पूर्ण शुल्क परत केले जाईल.
- इतर उमेदवारांना ₹ 250 शुल्क कापून ₹ 500 परत केले जातील.
ISRO recruitment 2026 अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी ISRO LPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि योग्य आकाराचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ISRO LPSC वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.





