---Advertisement---

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026: ‘हिंदी अनुवादक’ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 48,000 पर्यंत मिळेल वेतन!

April 14, 2026 5:40 PM
Mumbai Port Authority Recruitment 2026
---Advertisement---

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026 : मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या सामान्य प्रशासन विभागातर्गत ‘हिंदी अनुवादक श्रेणी-2’ (Hindi Translator Gr. II) या पदासाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. नियमित तत्त्वावर होणाऱ्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

भरतीचा संक्षिप्त तपशील (Overview)

संस्थेचे नावमुंबई पोर्ट अथॉरिटी (MbPA)
पदाचे नावहिंदी अनुवादक श्रेणी-2 (Hindi Translator Gr. II)
एकूण जागा04 (3 – खुला प्रवर्ग, 1 – अज)
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन (Post/Hand Delivery)
शेवटची तारीख30 एप्रिल 2026
वेबसाइटwww.mumbaiport.gov.in

पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (हिंदी आणि इंग्रजी हे ऐच्छिक विषय असणे अनिवार्य).
  • अनुभव: इंग्रजी ते हिंदी आणि हिंदी ते इंग्रजी अनुवाद कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांपर्यंत सवलत मिळेल) .

वेतन आणि फायदे (Salary & Benefits)

निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 – 1,17,600 या वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. सर्व भत्ते मिळून अंदाजे मासिक वेतन 48,000 रुपये इतके असेल.

मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती निवड प्रक्रिया (Selection Process)

या पदासाठीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेवर आधारित असेल. परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:

  • एकूण गुण: 100.
  • कालावधी: 3 तास.
  • विषय: इंग्रजी-हिंदी अनुवाद, निबंध लेखन (हिंदी), सारांश लेखन, व्याकरण आणि पत्रव्यवहार.
  • परीक्षा केंद्र: परीक्षा मुंबईत आयोजित केली जाईल.
मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती अर्ज शुल्क (Application Fee)
  • खुला प्रवर्ग (UR): 500 रुपये.
  • ST आणि दिव्यांग (PwBD) उमेदवार: शुल्क नाही.
  • शुल्क भरण्याची पद्धत: डिमांड ड्राफ्ट (DD), पोस्टल ऑर्डर किंवा ऑनलाईन ट्रान्सफर.

हे देखील वाचा- आयुध निर्माणी अंबरनाथ मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 

अर्ज कसा करावा? (How to Apply)

1. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करावा. www.mumbaiport.gov.in

2. अर्ज पूर्ण भरून त्यासोबत आवश्यक शैक्षणिक आणि अनुभवाचे दाखले जोडावेत.

3. अर्ज एका लिफाफ्यात बंद करून त्यावर “Application for the post of Hindi Translator Gr. II” असे स्पष्ट लिहावे.

4. अर्ज पाठवण्याचा पत्ता: Dy. Secretary, HR Section, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai-400001.

लक्षात ठेवा: अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे.

Join WhatsApp

Join Now

Related Stories

Leave a Comment