MAHATET 2026 महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026’ चे अधिकृत प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी राज्यभरात घेतली जाणार आहे.
MAHATET 2026 परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक:
| कार्यवाहीचा टप्पा | कालावधी / दिनांक |
| ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणे | 27 मार्च 2026 ते 16 एप्रिल 2026 |
| प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करणे | 09 जून 2026 ते 21 जून 2026 |
| शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 (वेळ) | 21 जून 2026(सकाळी 10.30 ते दुपारी 1.00) |
| शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 (वेळ) | 21 जून 2026 (दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00) |
MAHATET 2026 महत्त्वाच्या सूचना:
- अनिवार्यता: इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- अर्ज प्रक्रिया: उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज भरताना 10 वी, 12 वी आणि व्यावसायिक अर्हतेची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
- दोन्ही पेपरसाठी एकच अर्ज: ज्या उमेदवारांना पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी अर्जात तसा विकल्प निवडावा. त्यांच्यासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही.
- गैरप्रकार करणाऱ्यांना बंदी: सन 2018 आणि 2019 च्या परीक्षेत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही.
अर्ज प्रक्रिया आणि अटी
१. कसा करावा अर्ज: उमेदवारांना केवळ https://mahatet.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल; ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
२. दोन्ही पेपरसाठी एकच अर्ज: ज्यांना दोन्ही स्तरांच्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी अर्जात तसा विकल्प निवडावा. त्यांच्यासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही, ज्यामुळे त्यांची बैठक व्यवस्था एकाच केंद्रावर होऊ शकेल.
३. दुरुस्तीला संधी नाही: एकदा परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे माहिती अचूक भरावी.
४. प्रतिबंधित उमेदवार: सन २०१८ व २०१९ मधील परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही.
परीक्षार्थ्यांसाठी सूचना
अर्ज भरताना उमेदवारांनी आपला स्कॅन केलेला रंगीत फोटो, स्वाक्षरी आणि ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच, भविष्यातील संपर्कासाठी आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूक द्यावा. अधिक माहितीसाठी उमेदवार 9028472681 / 82 /83 (सकाळी 10 ते सायंकाळी 6 ) या वेळेत संपर्क साधू शकतात.










