भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या BEML Limited ने ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह (Junior Executive) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर असून, 1 वर्ष आणि 4 वर्षांच्या कालावधीसाठी भरली जाणार आहेत.
BEML Recruitment 2026 रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
| पद आणि शाखा | एकूण जागा | कालावधी |
| ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह (Mechanical/ Production/ Industrial) | 31 | 1 आणि 4 वर्षे |
| ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह (Electrical Engineering) | 33 | 1 आणि 4 वर्षे |
| ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह (Electronics/ Instrumentation) | 14 | 1 आणि 4 वर्षे |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 25 मार्च 2026.
- अर्जाची शेवटची तारीख: 7 एप्रिल 2026 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत).
BEML Recruitment 2026 पात्रता निकष (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात किमान 60 % गुणांसह BE/B.Tech पदवी आवश्यक (SC/ST/PwD उमेदवारांसाठी 55 % गुण).
- अनुभव: 1 वर्षाच्या पदासाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. 4 वर्षांच्या पदासाठी 0-2 वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य मिळेल.
- वयोमर्यादा: ७ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय २९ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (SC/ST ला 5 वर्षे, तर OBC ला 3 वर्षे सवलत) .
निवड प्रक्रिया (Selection Process)
1. 1 वर्षाची पदे: पदवीच्या गुणांच्या आधारे थेट गुणवत्ता यादी (Merit List) लावली जाईल. 2. 4 वर्षांची पदे: 60 गुणांची लेखी परीक्षा (MCQ) आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.
BEML Recruitment 2026 पगार आणि मानधन (Salary)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे एकत्रित मानधन दिले जाईल:
- पहिले वर्ष: ₹35,000 प्रति महिना.
- दुसरे वर्ष: ₹37,500 प्रति महिना.
- तिसरे वर्ष: ₹40,000 प्रति महिना.
- चौथे वर्ष: ₹43,000 प्रति महिना.
अर्ज शुल्क (Application Fee)
- General/OBC/EWS: ₹500.
- SC/ST/PwD: अर्ज शुल्क नाही.
BEML Recruitment 2026 अर्ज कसा करावा?: पात्र उमेदवारांनी www.bemlindia.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नोंदणी अर्जाची प्रत सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा








