NHPC भरती 2026: भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘एनएचपीसी लिमिटेड’ (NHPC Limited) या नवरत्न कंपनीने तरुण अभियंत्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. GATE-2024 किंवा GATE-2025 च्या गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.
NHPC भरती 2026: रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
एकूण 72 जागांसाठी ही विशेष भरती मोहीम (Special Recruitment Drive) राबवली जात आहे.
| पदनाम | एकूण रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता (किमान 60% गुणांसह) |
| प्रशिक्षणार्थी अभियंता (Civil) | 11 | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B.E./B.Tech/B.Sc Engg) |
| प्रशिक्षणार्थी अभियंता (Electrical) | 35 | इलेक्ट्रिकल / पॉवर सिस्टीम / पॉवर इंजिनिअरिंग पदवी |
| प्रशिक्षणार्थी अभियंता (Mechanical) | 26 | मेकॅनिकल / प्रोडक्शन / थर्मल / ऑटोमेशन पदवी |
पगार आणि इतर फायदे (Salary & Benefits)
- वेतनमान: 50,000 ते 1,60,000 रुपये (E2 ग्रेड).
- एकूण वार्षिक पॅकेज: सुमारे 15 ते 16 लाख रुपये (CTC).
- इतर भत्ते: महागाई भत्ता, एचआरए, कॅंटीन भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा लाभ (PF, Pension).
निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीसाठी केवळ अर्ज करून चालणार नाही, तर निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत होईल:
- GATE स्कोअर (75% भारांक): GATE-2024 किंवा GATE-2025 मधील सर्वोत्तम गुण.
- ग्रुप डिस्कशन (05% भारांक): निवडक उमेदवारांना बोलावले जाईल.
- वैयक्तिक मुलाखत (20% भारांक): मुलाखतीतील कामगिरीवर अंतिम निवड अवलंबून असेल.
हे ही वाचा : Bank of Baroda Recruitment 2026 : ‘वेल्थ मॅनेजमेंट’ विभागात १०४ जागांची भरती;
NHPC भरती २०२६ महत्त्वाच्या अटी आणि निकष
- वयोमर्यादा: 6 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (SC/ST ला 5 वर्षे, तर OBC ला 3 वर्षे सूट) .
- अर्ज शुल्क: OBC उमेदवारांसाठी 708 रुपये (जीएसटीसह). तर SC/ST/दिव्यांग/महिला आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क नाही.
- नोकरीचे ठिकाण: भारतामध्ये किंवा परदेशात कोठेही नियुक्ती होऊ शकते.
- अंतिम वर्षाचे विद्यार्थी: सध्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी या भरतीसाठी पात्र नाहीत.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात: 16 मार्च 2026 (सकाळी 10.00 वाजेपासून).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2026 (संध्याकाळी 5.00 पर्यंत).
NHPC भरती 2026 अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी www.nhpcindia.com या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Careers’ टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना GATE नोंदणी क्रमांक (Registration Number) असणे अनिवार्य आहे.





