---Advertisement---

DIAT Pune Recruitment 2026: पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती; 6 एप्रिलला थेट मुलाखत!

March 31, 2026 10:32 AM
DIAT Pune Recruitment 2026
---Advertisement---

DIAT Pune Recruitment 2026: संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’ (DIAT) मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून केवळ ‘थेट मुलाखती’द्वारे (Walk-in-Interview) निवड केली जाणार आहे.

DIAT पुणे भरती 2026: रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण 6 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विभागांनुसार पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  • लायब्ररी असिस्टंट (ग्रंथालय विभाग): 01 पद
  • लॅब टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग): 02 पदे
  • लॅब टेक्निशियन (एरोस्पेस इंजिनिअरिंग व ऑटोनॉमस सिस्टिम): 01पद
  • असिस्टंट (सामान्य प्रशासन): 02 पदे

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने संबंधित विषयात पदवी (Science/Engineering) किंवा डिप्लोमा (Engineering) पूर्ण केलेला असावा.
  • विशेष अट: पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यापासून मुलाखतीच्या तारखेपर्यंतचा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
  • वयोमर्यादा: किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे. (SC/ST/OBC/PWD उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल)

मिळणारे मासिक विद्यावेतन (Monthly Stipend)

निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल:

  • पदवीधर शिकाऊ उमेदवार (Graduate Apprentice): ₹12,300/- दरमहा.
  • डिप्लोमा शिकाऊ उमेदवार (Diploma Apprentice): ₹10,900/- दरमहा.

(या विद्यावेतनात केंद्र सरकारच्या ‘DBT’ योजनेचा समावेश आहे).

DIAT पुणे भरती 2026: मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:

  • दिनांक: 6 एप्रिल 2026.
  • वेळ: सकाळी 11.00  वाजता.
  • ठिकाण: डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (DIAT), गिरीनगर, खडकवासला धरणाजवळ, पुणे – 411 025.
  • संपर्क: 020- 24604409 किंवा recurit@diat.ac.in.

येथेही अर्ज करा.- ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे 400 पदांची भरती,  सविस्तर जाहिरात प्रसिद्ध

मुलाखतीसाठी जाताना सोबत घ्यायची कागदपत्रे (Required Documents)

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी अर्जाचा नमुना आणि मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती (Xerox) सोबत ठेवणे अनिवार्य आहे:

1. 10 वी आणि 12 वीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र. २. पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका. ३. जन्म तारखेचा पुरावा. ४. जातीचा दाखला (आवश्यक असल्यास). ५. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकची प्रत. ६. 2 पासपोर्ट साईज फोटो.

DIAT Pune Recruitment 2026: महत्त्वाच्या सूचना:
  • उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी NATS 2.0 पोर्टलवर (https://nats.education.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • शिकाऊ उमेदवारीचा कालावधी केवळ एक वर्षाचा असेल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने कामावर रुजू व्हावे लागेल.
    अधिक माहितीसाठी – या लिंकवर क्लिक करा

पुण्यातील अशाच नवनवीन जॉब अपडेट्ससाठी आमचे jobsinfo.in हे पोर्टल दररोज वाचत राहा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment