IDBI Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी IDBI बँकेने सुवर्णसंधी आणली आहे. बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांची 33 जागांची भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये प्रामुख्याने IT, ऑडिट आणि रिस्क मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड केली जाणार आहे.
IDBI Bank Recruitment 2026: महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: 25 मार्च 2026.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2026.
- पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख: 01 मार्च 2026.
IDBI Bank Recruitment 2026: पदांचा तपशील आणि रिक्त जागा
| पदाचे नाव (Functional Area) | रिक्त जागा | ग्रेड (Grade) |
| ऑडिट – इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) | 02 | Grade C |
| रिस्क मॅनेजमेंट – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी | 04 | Grade B & C |
| IT आणि MIS (Finacle, AI/ML, Cloud इ.) | 19 | Grade B, C & D |
| सिक्युरिटी ऑफिसर (Security Officer) | 08 | Grade O |
| एकूण पदे | 33 |
पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility & Age Limit)
उमेदवाराची पात्रता 01 मार्च 2026 रोजी खालीलप्रमाणे असावी:
- डेप्युटी जनरल मॅनेजर (Grade D): वय 35 ते 45 वर्षे. किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- असिस्टंट जनरल मॅनेजर (Grade C): वय 28 ते 40 वर्षे. किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- मॅनेजर (Grade B): वय 25 ते 35 वर्षे. किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- सिक्युरिटी ऑफिसर (Grade O): कमाल वय 50 वर्षे. निवृत्त JCO (सैन्य दलातील) किमान 15 वर्षे सेवा.
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात B.E./B.Tech, MCA किंवा M.Sc (IT/CS) पदवी अनिवार्य आहे.
IDBI Bank Recruitment 2026: पगार आणि भत्ते (Salary & Benefits)
निवड झालेल्या उमेदवारांना महानगरानुसार खालीलप्रमाणे अंदाजित मासिक पगार मिळेल:
- Grade D: ₹1,97,000 प्रति महिना.
- Grade C: ₹1,64,000 प्रति महिना.
- Grade B: ₹1,24,000 प्रति महिना.
- Grade O: वार्षिक ₹6.14 लाख ते ₹6.50 लाख.
हे ही वाचा- NaBFID Recruitment 2026: नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटमध्ये 30 पदांसाठी भरती
अर्ज शुल्क (Application Fee)
- SC/ST/PWD: ₹250 (फक्त इंटिमेशन चार्जेस).
- इतर सर्व (General/OBC/EWS): ₹1050.
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड प्रामुख्याने प्राथमिक छाननी (Screening), ग्रुप डिस्कशन (GD) आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) याद्वारे केली जाईल.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
पात्र उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत करिअर पेजवर https://www.idbi.bank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज करताना तुमचा अद्ययावत CV (PDF), फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक– सविस्तर जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.





