---Advertisement---

EPFO LDCE Recruitment 2026: लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांसाठी विभागीय भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

March 25, 2026 3:35 PM
EPFO LDCE Recruitment 2026
---Advertisement---

EPFO LDCE Recruitment 2026: कर्मचारी भविष्य निधि संघटन (EPFO) मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. EPFO ने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) आणि ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) या पदांच्या पदोन्नतीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) 2026 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

ही परीक्षा IBPS द्वारे आयोजित केली जाणार असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात एकूण 153 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज करण्यास सुरुवात: 20 मार्च 2026.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 एप्रिल 2026.
  • अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची मुदत: 4 एप्रिल 2026.
  • परीक्षेचा अंदाजित दिनांक: 2 मे 2026.

EPFO LDCE Recruitment 2026 रिक्त पदांचा तपशील :

एकूण 153 रिक्त जागांपैकी मुख्य राज्यांतील जागा खालीलप्रमाणे आहेत:

  • महाराष्ट्र (Maharashtra): 42 जागा.
  • गुजरात (Gujarat): 19 जागा.
  • पश्चिम बंगाल (West Bengal): 12 जागा.
  • कर्नाटक (Karnataka): 10 जागा.
  • हेड ऑफिस (Head Office): 07 जागा.

EPFO LDCE Recruitment 2026:पात्रता निकष

1 जानेवारी 2025 या कट-ऑफ तारखेनुसार उमेदवारांची पात्रता तपासली जाईल:

  1. शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान मॅट्रिक्युलेशन (10 वी) किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा.
  2. अनुभव (LDC): 5 वर्षांची नियमित सेवा पूर्ण असलेले ग्रुप ‘D’ आणि ग्रुप ‘C’ कर्मचारी पात्र आहेत.
  3. अनुभव (JSA): पे-मॅट्रिक्स लेव्हल-1 मध्ये 3 वर्षांची नियमित सेवा आवश्यक आहे.

EPFO LDCE Recruitment 2026 : परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम

ही परीक्षा संगणक आधारित (CBT) असेल आणि सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQs) असतील.

  • एकूण गुण: 100 गुण.
  • वेळ: 2 तास (120 मिनिटे).
  • विषय आणि गुण विभागणी:
    • इंग्रजी (English): 25 गुण.
    • प्रशासन (Administration): 25 गुण (रजा नियम, LTC, NPS, GPF, RTI इ.).
    • अंकगणित (Arithmetic): 25 गुण.
    • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning): 25 गुण.

टीप: परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य प्रवर्गाला 40% आणि SC/ST/PwBD उमेदवारांना 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.

IIFCL Recruitment 2026: आयआयएफसीएलमध्ये ‘प्रबंधक’ पदांची मोठी भरती; २३ लाखांपर्यंत पॅकेज

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. उमेदवारांनी https://ibpsreg.ibps.in/epfofeb26/ या अधिकृत लिंकवर जाऊन नोंदणी करावी.
  2. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची PDF प्रत डाउनलोड करावी.
  3. ही प्रत स्वाक्षरीसह तुमच्या विभागीय कार्यालयात (ACC/Director) 4 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावी.
  4. अधिक माहितीसाठी खालील  नोटीफिकेशन या लिंकवर क्लिक करा.
    नोटिफिकेशन लिंक
    परीक्षा सर्क्युलर लिंक

Join WhatsApp

Join Now

Related Stories

Leave a Comment