MbPA Bharti 2026 केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई पोर्ट ऑथॉरिटीमध्ये (Mumbai Port Authority) नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विविध विभागांमधील ‘क्लास-1’ (Class I) श्रेणीतील 14 रिक्त पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची सविस्तर माहिती पाहूयात.
MbPA Bharti 2026: पदनिहाय तपशील आणि शैक्षणिक पात्रता
मुंबई पोर्ट ऑथॉरिटीने विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदांचा क्रम आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- असिस्टंट डायरेक्टर (EDP) – 01 जागा: कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स पदवी किंवा गणित/सांख्यिकी/अर्थशास्त्र विषयातील पदवीसह कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा.
- असिस्टंट डायरेक्टर (संशोधन) – 01 जागा: अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणित विषयातील पदवी.
- कॅटरिंग ऑफिसर – 01 जागा: पदवी आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी व अप्लाइड न्यूट्रिशनमधील डिप्लोमासह 3 वर्षांचा अनुभव.
- असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – 01 जागा: इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी.
- एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – 02 जागा: संबंधित इंजिनीअरिंग पदवी आणि किमान 5 वर्षांचा कार्यकारी स्तरावरील अनुभव.
- एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (मेकॅनिकल) – 02 जागा: मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी आणि किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव.
- डेप्युटी सेक्रेटरी – 01 जागा: पदवी आणि प्रशासन किंवा कार्मिक विभागात किमान 9 वर्षांचा अनुभव.
- सीनिअर वेलफेअर ऑफिसर – 03 जागा: पदवी, सोशल सायन्समध्ये पदवी/डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- डेप्युटी मॅनेजर (वेलफेअर) – 02 जागा: पदवी, सोशल सायन्स पदवी/डिप्लोमा, 9 वर्षांचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य.
MbPA Bharti 2026: पगार आणि वयोमर्यादा
पगार: निवडीनंतर असिस्टंट डायरेक्टर आणि इंजिनीअरिंग पदांसाठी अंदाजे 94,500 रुपये, तर डेप्युटी सेक्रेटरी व मॅनेजर पदांसाठी अंदाजे 1,13,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
वयोमर्यादा: पदांनुसार वयोमर्यादा 30 ते 40 वर्षांपर्यंत आहे. सरकारी नियमांनुसार दिव्यांग आणि माजी सैनिकांना वयात सवलत दिली जाईल.
MbPA Bharti 2026: महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात: 06 मार्च 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 एप्रिल 2026
अर्ज शुल्क भरण्याची मुदत: 06 एप्रिल 2026 पर्यंत
MbPA Bharti 2026: अर्ज शुल्क (Application Fee)
दिव्यांग उमेदवार (PwBD): 250 रुपये + 18% GST. इतर सर्व उमेदवार: 750 रुपये + 18% GST.
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा (Online Exam) आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखतीवर (Interview) आधारित असेल. परीक्षेमध्ये तांत्रिक विषय, रिझनिंग, इंग्रजी आणि काही पदांसाठी मराठी भाषेचा समावेश असेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- मुंबई पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mumbaiport.gov.in जा.
- ‘People & Career / Jobs’ या मेनूमध्ये ‘Apply Online’ वर क्लिक करा.
- ‘Click here for New Registration’ पर्यायावर जाऊन नाव व संपर्क माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरून प्रिंट काढून ठेवा.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: Mumbai Port Authority Jobs





