---Advertisement---

MAHAGENCO Bharti 2026: महानिर्मितीमध्ये वित्त आणि लेखा विभागात विविध पदांची भरती; 2.5 लाखांपर्यंत पगार!

March 12, 2026 5:30 PM
MAHAGENCO Bharti 2026
---Advertisement---

MAHAGENCO Bharti 2026: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MAHAGENCO) मध्ये वित्त आणि लेखा (Finance & Accounts) विभागात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महानिर्मितीने विविध उच्च पदांसाठी अधिकृत जाहिरात (Advt. No. 03/2026) प्रसिद्ध केली असून योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

MAHAGENCO Bharti 2026 रिक्त पदांचा तपशील आणि पगार (Vacancy & Salary)

या भरती प्रक्रियेद्वारे खालील रिक्त पदे भरली जाणार आहेत:

  • जनरल मॅनेजर (F&A): 3 पदे (पगार: रु. 1,24,995 – 2,56,755)
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (F&A): 3 पदे (पगार: रु. 1,02,890 – 2,28,420)
  • सीनियर मॅनेजर (F&A): 9 पदे (पगार: रु. 97,220 – 2,09,445)
  • मॅनेजर (F&A): 4 पदे (पगार: रु. 73,580 – 1,66,555)
  • डेप्युटी मॅनेजर (F&A): 2 पदे (पगार: रु. 54,505 – 1,42,050)

MAHAGENCO Bharti 2026 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • GM, AGM, Sr. Manager आणि Manager: CA किंवा ICWA फायनल उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • डेप्युटी मॅनेजर: Inter CA/ICWA उत्तीर्ण किंवा MBA (Finance) किंवा M.Com पदवी आवश्यक.

MAHAGENCO Bharti 2026 अनुभव आणि वयोमर्यादा (Experience & Age Limit)

  • उमेदवारांकडे पदांनुसार किमान 1 ते 10 वर्षांचा वित्त/लेखा/ऑडिट क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: खुला प्रवर्ग – 38 ते 48 वर्षे (पदानुसार), महानिर्मिती कर्मचाऱ्यांसाठी 57 वर्षांपर्यंत सूट. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि शुल्क (Dates & Application Fee)

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 फेब्रुवारी 2026.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026.
  • अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु. 800 + GST (एकूण रु. 944), राखीव प्रवर्ग – रु. 600 + GST (एकूण रु. 708). दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process)

1. उच्च पदांसाठी (GM, AGM, Sr. Manager) ‘असेसमेंट सेंटर टेस्ट’ आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. 2. मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल.

MAHAGENCO Bharti 2026 अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी महानिर्मितीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahagenco.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.  त्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/mspgcsep25/. ही परीक्षा

GM, AGM आणि Sr. Manager पदाच्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत (Hard Copy) आवश्यक कागदपत्रांसह मुंबईतील कार्यालयात 20 मार्च 2026 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Related Stories

Leave a Comment