---Advertisement---

MECL Apprenticeship 2026: ITI आणि पदवीधरांसाठी संधी! MECL नागपूरमध्ये 30 जागांसाठी ‘शिकाऊ उमेदवार’ भरती

March 6, 2026 9:44 AM
MECL Apprenticeship 2026:
---Advertisement---

भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या मॅग्नेशियम एक्सप्लोरेशन अँड कन्सलटन्सी लिमिटेड‘ (MECL), नागपूर यांनी सन 2025-26 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentices) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘अँप्रेंटिसशिप ॲक्ट, 1961’ नुसार एकूण 30 जागांसाठी एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

MECL Apprenticeship 2026: रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Vacancy Details):

ही भरती प्रामुख्याने तीन प्रवर्गात केली जाणार आहे:

  • 1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice):
    • विषय: केमिकल (Chemical), मेकॅनिकल (Mechanical), जिओफिजिस्ट (Geophysicist), जिओलॉजिस्ट (Geologist).
    • पात्रता: संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पदवी (B.Sc./B.E./B.Tech/B.Com/BCA).
    • स्टायपेंड: दरमहा 12,300/- रुपये.
  • 2. टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice):
    • विषय: केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन.
    • पात्रता: संबंधित विषयात किमान 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.
    • स्टायपेंड: दरमहा 10,900/- रुपये.
  • 3. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice – ITI):
    • ट्रेड: कोपा (COPA), फिटर, मेकॅनिक डिझेल, मशिनिस्ट.
    • पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र.
    • स्टायपेंड: दरमहा 10,560/- ते 11,040/- रुपये.

MECL Apprenticeship 2026: प्रशिक्षणाचे ठिकाण (Work Location):

निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर (महाराष्ट्र), लाछमनगड (छत्तीसगड) किंवा गोढी मल्लोई (छत्तीसगड) या प्रकल्पांवर नियुक्त केले जाईल.

अर्ज कसा करावा? (How to Apply):

  • पदवी आणि डिप्लोमा धारकांसाठी: उमेदवारांनी NATS पोर्टल (https://nats.education.gov.in/) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • ITI ट्रेड धारकांसाठी: उमेदवारांनी Apprenticeship India पोर्टल (https://www.apprenticeshipindia.gov.in) वर अर्ज करावा.

MECL Apprenticeship 2026: महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • ऑनलाईन नोंदणी सुरू: 24 फेब्रुवारी 2026.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 मार्च 2026.

अधिक माहितीसाठी: उमेदवार कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत  0712 – 2510320 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment