---Advertisement---

राज्य CET CELL कडून MBA/MMS प्रवेश अर्जामध्ये दुरुस्तीसाठी 2 मार्चपर्यंत मुदत

March 1, 2026 10:54 AM
MBA/MMS admissions
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी होणाऱ्या MBA/MMS प्रवेश परीक्षेचे अर्ज भरलेल्या उमेदवारांना एक महत्त्वाची संधी देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अर्जात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी’ऑनलाईन एडिट विंडो’ (Edit Facility) उपलब्ध करून दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी आपला MBA/MMS प्रवेश नोंदणी अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनाच ही दुरुस्ती करता येणार आहे. अर्जदारांना त्यांच्या माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी 2 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे

कोणत्या गोष्टींत बदल करता येईल?

उमेदवार MBA/MMS प्रवेश अर्जातील खालील सहा प्रमुख बाबींमध्ये दुरुस्ती करू शकतात:

  • उमेदवाराचे नाव
  • जन्मतारीख
  • छायाचित्र (Photograph)
  • स्वाक्षरी (Signature)
  • लिंग (Gender)
  • दुसरा प्रयत्न जोडणे (Add Second Attempt)

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर जाऊन स्वतःच्या लॉगिन आयडीद्वारे ही दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन CET सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

MBA

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment