छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील एकूण 222 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या तारखा आणि संकेतस्थळ
- अर्ज भरण्यास सुरुवात: 17 फेब्रुवारी 2026.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 मार्च 2026.
- अधिकृत संकेतस्थळ: www.chhsambhajinagarmc.org.
- प्रवेशपत्र: परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.
रिक्त पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी
या भरतीमध्ये तांत्रिक, अभियांत्रिकी आणि सुरक्षा विभागातील खालील पदांचा समावेश आहे:
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 32 पदे (वेतनश्रेणी: ₹38600 – 122800).
- अग्निशामक: 100 पदे (वेतनश्रेणी: ₹19900 – 63200).
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अतिक्रमण निरीक्षक: 24 पदे.
- स्वच्छता निरीक्षक: 12 पदे.
- रोखपाल: 12 पदे.
- उपअग्निशमन केंद्र अधिकारी: 04
- चालक-यंत्रचालक : 15
- उद्यान सहाय्यक : 06
- अनुरेखक : 09
- पशुधन पर्यवेक्षक : 07 आणि
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी : 01
वयोमर्यादा आणि पात्रता
- वयोमर्यादा (31 जानेवारी 2026 रोजी): खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय/अनाथ/आदुघ प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
- पात्रता: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव वेगळा असून, सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹1000/-.
- मागास प्रवर्ग/अनाथ: ₹900/-.
- माजी सैनिक: शुल्क माफ.
निवड प्रक्रिया
ही भरती ऑनलाइन परीक्षेच्या (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न) माध्यमातून केली जाईल. अग्निशमन सेवेतील पदांसाठी ऑनलाइन परीक्षेशिवाय मैदानी चाचणी देखील घेतली जाणार आहे. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल.
मदत हवी असल्यास: अर्ज भरताना काही समस्या आल्यास 1800222366 /18001034566 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.



